Indurikar Maharaj : सैन्यात शेतकऱ्यांची मुलं, ही शिवरायांची किमया !

Shivaji Maharaj strengthan people from lower society : इंदुरीकर महाराजांनी सांगितली शिवाजी महाराजांची महती

Buldhana छत्रपती शिवाजी महाराजांनी गरीब, शेतकरी आणि समाजाच्या तळागाळातील लोकांना ताकद दिली. आज पोलीस, सैन्य आणि विविध सेवांमध्ये शेतकऱ्यांचीच मुले दिसतात. हे शिवरायांच्या कार्याचे यश आहे, या शब्दांत ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शिवाजी महाराजांची महती विषद केली.

बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्यात त्यांच्या शिवकीर्तनाने उत्सवाचा दणदणीत प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्मकांड नव्हे, तर सत्कर्मालाच महत्त्व दिले, त्यामुळेच ते सर्वश्रेष्ठ ठरले, असंही निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले. शाळांमध्ये मोबाईलबंदीची नितांत गरज असल्याचंही ते म्हणाले.

Fair Price Shops : स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी !

बुलढाण्यातील ‘शिवनेरी’ जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानावर आयोजित या शिवकीर्तनासाठी तब्बल १५ हजार शिवभक्तांनी हजेरी लावली. संपूर्ण परिसर छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दणाणून गेला. महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Gang rape of a minor girl : परीक्षाकेंद्रावर नव्हे थेट कारागृहात पोहोचला

कार्यक्रमाचे उद्घाटन धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ. वसंतराव चिंचोले होते. या वेळी राजेंद्र काळे, उमेश शर्मा, अ‍ॅड. दिनोदे, रणजीतसिंह राजपूत, मृत्यूंजय गायकवाड, डॉ. शोण चिंचोले, राजेश हेलगे, सुनील सपकाळ, अरविंद होंडे, निलेश भुतडा, आदेश कांडेलकर, गोपालसिंग राजपूत यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल वानखेडे यांनी केले.