Shivendraraje : काँग्रेस – राष्ट्रवादींनी ओबीसी- मराठ्यांचा वापर केला

Fadnavis is a leader like the Himalayas – Shivendraraje Bhosale : फडणवीस हिमालयासारखे नेते – शिवेंद्रराजे भोसले

Satara : “देवेंद्र फडणवीस हे फक्त वंचितांचे किंवा ओबीसींचे नेते नाहीत, तर मराठ्यांचेही नेते आहेत. त्यांनी कधीही समाजाचा वापर राजकारणासाठी केला नाही. ओबीसी किंवा मराठा आरक्षणाबाबत कुणाच्याही हक्काला धक्का न लावता त्यांनी निर्णय घेतले. त्यामुळे फडणवीस हे हिमालयासारखे नेते आहेत,” अशी स्तुती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

साताऱ्यातील क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात बोलताना शिवेंद्रराजेंनी फडणवीसांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. शिवेंद्रराजे म्हणाले, “राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीचा शासकीय सोहळा व्हावा, अशी मागणी होती. समाजाला अनेक वर्ष दाबून ठेवण्यात आलं. पण समजून घेणारे नेते सत्तेत आल्यावर ही जयंती सुरू झाली.

Chandrashekhar Bawankule : विजय वडेट्टीवारांनी डॉ. तायवाडेंचे मार्गदर्शन घ्यावे !

ज्यांनी दशकानुदशके सत्ता चालवली, त्यांना हे जमलं नाही. पण मोदी पंतप्रधान झाल्यावर दिल्लीत शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे उभारले गेले. महाराष्ट्रात उमाजी नाईक जयंतीची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी केली.”

ते पुढे म्हणाले, “देशात ओबीसी मुलांचा विकास नरेंद्र मोदींमुळे आणि राज्यात देवेंद्र फडणवीसांमुळे झाला आहे. फडणवीसांना प्रश्नांची जाण आहे म्हणूनच त्यांनी थोपटे यांच्या कारखान्यांना 420 कोटी रुपयांचे कर्ज दिले.”

यावेळी शिवेंद्रराजेंनी थेट विरोधकांवर निशाणा साधला. “राजकीय पोळी भाजण्याचं काम करणाऱ्यांनीच ओबीसी आणि मराठा समाजाचा वापर केला. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष सामील आहेत. फडणवीसांनी मात्र कधीही समाजाचा वापर राजकारणासाठी केला नाही. आरक्षणासाठी बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, कारण फडणवीसांनी कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावलेला नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शिवेंद्रराजेंनी आपल्या कामगिरीचा उल्लेख करताना सांगितलं, “मला मंत्री होण्याची संधी मिळाली. माझ्या विभागातून आता समाजासाठी काम करता येतंय. रामोशी समाज आणि छत्रपती घराण्याशी संबंधित कामांना वेग मिळतोय. स्मारकाचं कामही लवकरच पूर्ण होईल. आपण आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे,” असे ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : जाहिरात कुणीही छापो, ह्यांच्या पोटात का दुखतंय ?

शिवेंद्रराजे भोसले यांच्या या विधानामुळे साताऱ्यातील कार्यक्रमात टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या हल्ल्यामुळे आगामी काळात राजकीय वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.