Shivsena protest : तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे का?, शिवसेनेचा सवाल

Demand to Remove Private Individuals from Government Work : खाजगी व्यक्तींना शासकीय कामातून बाहेर काढण्याची मागणी

Chikhali चिखली तालुक्यातील अनेक तलाठी मुख्यालयी राहण्यास टाळाटाळ करत असून, त्यांनी शासकीय कामांसाठी खाजगी व्यक्तींना रोजंदारीवर ठेवले असल्याचे गंभीर आरोप शिवसेनेने केले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रमाणपत्रे, दाखले, नोंदी यांसारख्या कामांसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने संतप्त नागरिकांच्या वतीने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महसूल विभागाने प्रत्येक गावात शेतकरी व सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी तलाठी नेमले आहेत. मात्र अनेक तलाठी अधिकारी वर्गाशी हातमिळवणी करून मुख्यालयी न राहता अन्य ठिकाणांहून कामे करतात. काही तलाठ्यांनी तर त्यांच्या कार्यालयीन कामासाठी खाजगी व्यक्तींना रोजनदारीवर ठेवले असून, हे लोक जनतेकडून पैशांची मागणी करतात, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Farmers suicide : “नव नगराची अधिसूचना काढा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या!”

या अनधिकृत व्यक्तींच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, अशा तलाठ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तहसीलदार संतोष काकडे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना “तलाठ्यांकडून कोणत्याही नागरिकाला त्रास होत असल्यास त्यांनी थेट आमच्याकडे लेखी तक्रार करावी. संबंधितांविरुद्ध त्वरित कारवाई करण्यात येईल,” असे सांगितले आहे.

तथापि, स्थानिक जनतेत महसूल विभागाच्या निष्क्रियतेबाबत रोष वाढत असून, अनेक ठिकाणी तलाठी भवन तयार असूनही तलाठी कार्यालय तालुक्याच्या ठिकाणीच ठेवले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना चिखली येथे अनेक वेळा चकरा माराव्या लागत आहेत.

शिवसेनेने इशारा दिली आहे की, “जर प्रशासनाने या प्रकाराला आळा घातला नाही, तर आम्ही ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करू. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी तहसील प्रशासनावर राहील,” असे निवेदनात स्पष्ट म्हटले आहे.

Congress Meeting : वंचितला सोबत घ्या, पण महायुतीतील कोणताही पक्ष चालणार नाही

या निवेदनावर रवींद्र काकडे, गोपीनाथ लहाने, अमर सुसर, श्रीकांत टेरे, अशोक पवार, अमर काळे, पंजाबराव जावळे, बंडू नेमाने, दीपक शेळके, राजेंद्र मस्के, रवी अंभोरे, स्वप्निल जाधव, विजयाताई भारती, आशाताई देशमुख आदींच्या सह्या आहेत.