Villagers of Kingaon Raja begin an indefinite hunger strike : किनगाव राजा ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू
Sindkhedraja किनगाव राजा गावातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला विरोध नसतानाही, प्रकल्पाचे ठिकाण बदलण्याच्या मागणीसाठी १५ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. १७ सप्टेंबर रोजीही हे उपोषण सुरूच होते.
शासनाने शासकीय गट क्र. ५२५ मधील एच-क्लास जागेवर प्रकल्पाचे नियोजन केले आहे. परंतु या जागेजवळ लोकवस्ती असल्याने नागरिकांनी प्रकल्प पर्यायी शासकीय गट क्र. ६२३ मधील १३.३४ हेक्टर उपलब्ध जागेत स्थलांतरित करावा, अशी एकमुखी मागणी केली आहे.
Uddhav Balasaheb Thackarey : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे विटंबन, ठाकरे गटाचे आंदोलन
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रकल्पाच्या ठिकाणी भविष्यातील मानवी कल्याणकारी योजना, शासकीय कार्यालये व सार्वजनिक सोयीसुविधांसाठी जागा योग्य आहे. त्यामुळे सरकारने लोकभावना लक्षात घेऊन प्रकल्पाच्या जागेचा पुनर्विचार करावा. यासोबतच फुले नगर येथील ५०-६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे नमुना आठ अ मध्ये नोंदवून घरकुल लाभ द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
PM Modi Birthday : पंतप्रधानांच्या वाढदिवसाला राष्ट्रीय बेरोजगार दिन!
प्रशासनाला यापूर्वी लेखी निवेदन दिले असतानाही कोणतीही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी उपोषणस्थळी शिवाजीराव काकुसे, मधुकर साळवे, प्रसाद कुलकर्णी, दीपक साळवे, ज्ञानेश्वर कायंदे, सचिन मांटे, वसंता साळवे, सर्जेराव गोरे, दत्तात्रय साळवे आदी ग्रामस्थ बसले आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य सीमा काळुसे, विद्या साळवे, रंजना साळवे यांच्यासह शेकडो नागरिकांनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला आहे.