Sonam Wangchuk case : सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध — अकोल्यात निघाला भव्य कॅन्डल मार्च!

Grand Candle March Held in Akola : विविध संस्था-संघटनांचा सहभाग; गांधी-जवाहर बाग ते हुतात्मा स्मारक मार्गावर शेकडो नागरिकांची हजेरी

Akola प्रसिद्ध अभियंता, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात गांधी-जवाहर बाग ते हुतात्मा स्मारक असा भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी संस्था-संघटनांचा यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग होता.

कॅन्डल मार्चचे नेतृत्व शेतकरी नेते व किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केले. या मार्चमध्ये माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रणजित कोरडे, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रा. प्रशांत जानोरकर, प्रा. डी. यू. पाटील, अशोक पटोकार, डॉ. सीमा तायडे, डॉ. वंदना मोरे, करुणा घुले, प्रा. मधू जाधव, शंकरराव लंगोटे, रामेश्वर बरगट, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, बहुजन पत्रकार संघाचे पुरुषोत्तम आवारे पाटील, तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले होते.

Tribal Reservation : आदिवासी आरक्षण बचावासाठी आज आक्रोश मोर्चा!

मार्च गांधी-जवाहर बाग येथून सुरू होऊन मदनलाल ठीना चौक, सीताबाई कला महाविद्यालय, सिव्हिल लाइन चौक, आकाशवाणी चौक आणि नेहरू पार्क मार्गे हुतात्मा स्मारक येथे पोहोचला. येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करून वांगचूक यांच्या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.

Chikhli Panchayat Samiti : शहीदांच्या शिलाफलकासाठी निधी नाही, दीड वर्षांपासून प्रतिक्षाच

या कॅन्डल मार्चमध्ये किसान ब्रिगेड, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन, जिल्हा सर्वोदय मंडळ, जिल्हा मराठी पत्रकार संघ, राष्ट्र सेवादल, जमाते इस्लामे हिंद, समता परिषद, महाराणा प्रताप प्रगतिशील मंडळ, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक संघ, नारीशक्ती सेवा फाउंडेशन, गुरुदेव सेवा मंडळ, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, आस्था योग फाउंडेशन, विदर्भ कॅरम असोसिएशन, तसेच अन्य संस्था-संघटनांचा सहभाग होता.