Protest Against the Reservation Demand of the Banjara–Dhangar Community : बंजारा–धनगर समाजाच्या आरक्षण मागणीविरोधात आदिवासी समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
Buldhana बंजारा व धनगर समाजाने अनुसूचित जमात प्रवर्गात आरक्षणाची मागणी केल्याच्या विरोधात सकल आदिवासी समाज बांधवांनी तीव्र भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’ आज, सोमवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. ही माहिती स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदिवासी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
मोर्चाची सुरुवात दुपारी १२ वाजता जयस्तंभ चौक येथील वीर एकलव्य महाराज पुतळ्याजवळून होणार असून, मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषदेत पुढे माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हैद्राबाद गॅजेट महाराष्ट्रात लागू करू नये, ही मोर्चाची प्रमुख मागणी असेल. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा, धनगर व इतर कोणत्याही जातींचा समावेश होऊ नये, असा ठाम आग्रह यावेळी व्यक्त करण्यात आला.
Chikhli Panchayat Samiti : शहीदांच्या शिलाफलकासाठी निधी नाही, दीड वर्षांपासून प्रतिक्षाच
याशिवाय खालील मागण्याही पुढे करण्यात आल्या आहेत —
आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र वळवू नये; वळविलेला निधी व्याजासह परत करावा.
बोगस आदिवासींना देण्यात आलेले सेवा संरक्षण आदेश मागे घेऊन त्यांना पदावरून बडतर्फ करावे.
छत्रपती संभाजीनगर येथे मुस्लिम धर्मीयांना टाकणकार जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणाची एसटी आय समितीमार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
आदिवासी समाजातील १२,५०० अधिसंख्य पदभरती व ८५,००० रिक्त पदे तात्काळ भरावीत.
High Court : खड्ड्यांमुळे अपघात; पालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करा
या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
पत्रकार परिषदेला मधुकर पवार (प्रदेश सचिव, एकलव्य संघटना), सौ. नंदिनी टारपे, गजानन सोळंके (विदर्भ सचिव, आदिवासी पारधी संघटना), विजय मोरे (जिल्हाध्यक्ष, एकलव्य भिल समाज), विनोद डाबेराव आणि राजेश टारपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.








