Controversial demand by a former minister to file cases against the victim women themselves : पिडीत महिलांवरच गुन्हे दाखल करून त्यांची ओळख सार्वजनिक करण्याची मागणी
Dongao महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे माजी मंत्री सुबोध सावजी पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या निवेदनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांची नावे, फोटो व व्हिडिओ सार्वजनिक करावेत, अशी मागणी त्यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सावजी यांनी निवेदनात बलात्काराचे दोन प्रकार असल्याचे नमूद करत, जबरदस्तीच्या घटनांमध्ये पीडितांची ओळख गुप्त ठेवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, स्वार्थ किंवा आर्थिक लाभासाठी काही महिला अशा घटनांमध्ये सहभागी होत असल्याचा दावा करत, अशा प्रकरणांतील महिलांची ओळख जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
revenue officer arrested : फेरफार रद्द आदेशाच्या मूळ प्रतीसाठी २० हजारांची लाच; महसूल अधिकारी गजाआड
महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांकडून या विधानाचा निषेध होण्याची शक्यता असून, महिलांच्या सन्मान आणि कायदेशीर संरक्षणाच्या मुद्द्यावरून हा वाद आणखी चिघळू शकतो.सध्याच्या कायद्यानुसार बलात्कार पीडितेची ओळख उघड करण्यास मनाई आहे आणि असे केल्यास कायदेशीर कारवाई होते. त्यामुळे सावजी यांच्या मागणीवर कायदेशीर आणि नैतिक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Vidarbha Farmers : विमा कंपनीकडून तुटपुंजी मदत, बुलढाण्यात शेतकरी संतप्त
दरम्यान, राज्यात नाशिकसह काही भागांतील घटनांचा उल्लेख करत त्यांनी ही मागणी केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांच्या विधानामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशीही टीका होत आहे. माजी मंत्री सुबोध सावजी नेहमीच निवेदने देण्यासाठी जिल्ह्यात प्रसिध्द आहेत. त्यांनी यावेळी वादग्रस्त मागणी केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.








