विश्लेषण
राजकारणाकडे अनेकदा केवळ आश्वासनांचा आणि सत्तेपुरता मर्यादित व्यवहार म्हणून पाहिले जाते. सत्ता गेली की कामं थांबतात, पद बदललं की निर्णयांची गती मंदावते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या राजकीय प्रवासाने या सर्व समजुतींना ठामपणे छेद दिला आहे. पदं बदलली, जबाबदाऱ्या आल्या-गेल्या, विरोधकांनी अडथळे आणले तरी त्यांच्या कामाचा वेग आणि दिशा कधीही बदलली नाही.
अर्थमंत्री म्हणून त्यांनी आर्थिक शिस्तीला प्राधान्य देत सरप्लस बजेट सादर करून राज्याच्या आर्थिक स्थैर्याला नवी दिशा दिली. वनमंत्री म्हणून त्यांनी पर्यावरण संवर्धनाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. विक्रमी वृक्षलागवडीमुळे महाराष्ट्राची ओळख हरित राज्य म्हणून झाली. सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात परत आणण्याचा ऐतिहासिक पराक्रम हा केवळ प्रशासकीय यश नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा क्षण ठरला.
तरुण वयापासूनच नेतृत्वगुण दाखवणाऱ्या मुनगंटीवार यांनी पराभवांना कधीच अपयश मानले नाही. सलग सात वेळा विधानसभेत निवडून येणं हे जनतेच्या विश्वासाचं आणि त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचं द्योतक आहे. सत्ता असो वा नसो, मंत्रीपद असो वा आमदारकी विधानसभेत जनतेचा बुलंद आवाज बनून प्रश्न मांडणं हीच त्यांची ओळख राहिली आहे. खासगी विधेयकांच्या माध्यमातून सार्वजनिक हिताचे विषय प्रभावीपणे मांडण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी ठरवलं… आणि ‘होणार नाही’ हे अशक्य !
मतदारसंघातील थेट जनसंपर्क, सामाजिक उपक्रम, शिक्षण, आरोग्य आणि दुर्बल घटकांसाठी केलेली कामे ही त्यांच्या राजकारणाची मानवी बाजू अधोरेखित करतात. फिरते जनसंपर्क कार्यालय, शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक संस्थांशी जोडलेली कार्यपद्धती यामुळे नेता आणि जनता यांच्यातील अंतर त्यांनी मिटवले. विकास म्हणजे केवळ आकडे नव्हे, तर माणसाच्या आयुष्यात होणारा बदल, ही भूमिका त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे स्पष्टपणे दिसते.
Sudhir Mungantiwar : बंगाली समाजाच्या विकासासाठी मुनगंटीवारांचे मोठे पाऊल!
आजही अभ्यासपूर्ण मांडणी, ठाम भूमिका आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुनगंटीवार वेगळे ठरतात. अडथळे त्यांना थांबवत नाहीत, उलट त्यातूनच त्यांची जिद्द अधिक तीव्र होते. म्हणूनच कितीही रोखण्याचे प्रयत्न झाले तरी मुनगंटीवारांचा विकासवेग अटळ, अखंड आणि कायम आहे.








