विश्लेषण
राजकारण म्हटलं की घोषणा आल्याच. काही लोक घोषणा करून वेळ मारून नेतात, तर काही लोक घोषणांसाठी योग्य वेळेच्या शोधात असतात; पण ‘दिला शब्द आणि केला पूर्ण’ या तत्वावर जीवन जगत प्रत्यक्षात बदल घडवणारे नेतृत्व विरळेच. आमदार सुधीर मुनगंटीवार त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या ठाम निर्णयक्षमतेतून मुल तालुक्यातील उथळपेठ गावाने थेट इतिहास घडवला आहे. सर्वांगीण विकासाच्या वाटेवर आधीच भक्कम पावलं टाकलेल्या उथळपेठने आता महाराष्ट्रातील अव्वल सर्वाधिक ‘१०० टक्के सौर ऊर्जा ग्राम’ म्हणून राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या संकल्पनेचा आदर्श घेऊन आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून गावपातळीवर प्रत्यक्ष आकार मिळाला असून, १८० पैकी १८० घरांवर सौर पॅनल बसवून उथळपेठने विकास, पर्यावरण आणि स्वावलंबन यांचा निर्णायक संगम घडवून आणला आहे.
हे इतकं सोपं नव्हतं. आर्थिक अडचणी, प्रशासकीय प्रक्रिया, तांत्रिक आव्हानं आणि ग्रामीण पातळीवरील अशक्यता या सगळ्यांवर मात करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उथळपेठसाठी सौरग्रामचा निर्धार केला. सातत्यपूर्ण पाठपुरावा, ठाम निर्णय आणि लोकसहभागाच्या बळावर अशक्य वाटणारा प्रयोग प्रत्यक्षात उतरला. म्हणूनच उथळपेठचा सौरप्रवास केवळ एक योजना न राहता, राज्यासाठी दिशादर्शक ठरलेला आदर्श बनला आहे.
Sudhir Mungantiwar : बंगाली समाजाच्या विकासासाठी मुनगंटीवारांचे मोठे पाऊल!
एका गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती किंवा योजना नव्हे; तर त्या गावात राहणाऱ्या माणसांच्या जीवनात होणारा सकारात्मक बदल असतो. मुल तालुक्यातील उथळपेठ गावाने आज हाच विकास प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला आहे. ग्रामविकासाच्या प्रवासात एकामागोमाग एक टप्पे पार करत आता उथळपेठने स्वतःची ओळख महाराष्ट्रातील अव्वल ‘१०० टक्के सौर ऊर्जा ग्राम’ म्हणून निर्माण केली आहे. या परिवर्तनामागे आहे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची दूरदृष्टी, सातत्य आणि विकासासाठी घेतलेला ठाम पुढाकार.
मुल तालुक्यातील उथळपेठ गावातील १८० पैकी १८० घरांवर सौर पॅनल बसवून हे गाव पूर्णतः सौरऊर्जेवर आधारित झाले. उथळपेठमध्ये १८७ किलोवॅट क्षमतेची सौर प्रणाली कार्यरत असून दरमहा सुमारे २३ हजार युनिट वीज निर्मिती होत आहे. यामुळे गावकऱ्यांचे वीजबिल कमी झाले, अखंड वीजपुरवठा मिळू लागला आणि पर्यावरण संरक्षणालाही मोठे बळ मिळाले आहे. आ. मुनगंटीवार यांच्यासारख्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे हे शक्य झाले आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या प्रयत्नांतून एसएनडीटीला १०० कोटीचा निधी
८३ लाखांचा निधी, पण परिणाम अमूल्य
जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत शाश्वत विकास ध्येय योजनेतून सुमारे ८३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या निधीतून उथळपेठमधील प्रत्येक कुटुंब सौरऊर्जेचा लाभार्थी ठरले.हे केवळ आर्थिक गुंतवणुकीचे यश नाही, तर ग्रामीण भारतातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वावलंबन शक्य आहे, याचा ठोस संदेश देणारा प्रयोग ठरला आहे.
Sudhir Mungantiwar : आ.मुनगंटीवार यांची गोवंश पोषण, कुरण व शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी आग्रही मागणी
गावकऱ्यांचा सहभाग, प्रशासनाची साथ
या सौरग्राम यशामागे गावकऱ्यांचा सक्रीय सहभाग, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भूमिका आणि प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. अनुदान मिळेपर्यंत येणारी आर्थिक अडचण धनश्री पतसंस्थेच्या सहकार्यामुळे दूर झाली. ही बाब ग्रामीण भागातील सहकार्याची ताकद दाखवणारी आहे. यासाठी विद्युत महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी गावकऱ्यांना सहकार्य केलं. सर्वांचे सहकार्य आणि मुनगंटीवार यांचे वजन यामुळे एका १८० घरे असलेल्या छोट्या गावाने राज्यात आदर्श निर्माण करणारी कामगिरी बजावली आहे.
Sudhir Mungantiwar : ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करून एसीबीमार्फत चौकशी करा
इतर गावांसाठी मार्गदर्शक
उथळपेठच्या यशानंतर पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावानेही १०० टक्के सौरग्राम होण्याचा निर्णय घेतला आहे. हा परिणामच दाखवतो की उथळपेठ आता केवळ एक गाव राहिले नसून, राज्यासाठी दिशादर्शक मॉडेल बनले आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे.








