Sudhir mungantiwar : अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणाल्या, सुधीरभाऊ म्हणजे लोकांची मने जिंकणारे नेतृत्व

ghugus-cultural-festival-prarthana-behere-praises-sudhir-mungantiwar-development-leadership-news : घुग्घुस सांस्कृतिक महोत्सवात अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांचे मुनगंटीवारां विषयी गौरवोद्गार

Ghugus : राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविषयी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी जिव्हाळा, आदर आणि भावनिक नातं व्यक्त करत उपस्थितांची मनं जिंकली. सुधीरभाऊ म्हणजे लोकांची मने जिंकणारे नेतृत्व आहे अशा शब्दात त्यांनी मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे आयोजित भव्य सांस्कृतिक महोत्सवात अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी मनोगतातू त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या आठवणी सांगताना नमूद केले की, त्यांनी पत्रकार म्हणून काम सुरू केले तेव्हा सुधीरभाऊ मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री म्हणून कार्यरत होते. त्या काळात त्यांची भेट घेण्याची आणि त्यांचा मुलाखत घेण्याची तीव्र इच्छा होती, असे त्यांनी सांगितले. काळाच्या ओघात ती इच्छा पूर्ण झाली आणि आज त्यांच्यासोबत एकाच मंचावर उभं राहण्याचा योग आला, हे आपल्यासाठी अत्यंत खास आणि अविस्मरणीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Sudhir mungatiwar : मुनगंटीवारांनी दिला शब्द केला पूर्ण; बल्लारपूर गुरुद्वारात ज्येष्ठांसाठी लिफ्ट लोकार्पण

“आपल्या कामातून लोकांची मने जिंकणं हीच खरी कमाई असते आणि सुधीरभाऊंनी ती प्रामाणिकपणे मिळवली आहे,” असे सांगत त्यांनी मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. कला, बुद्धिमत्ता आणि शिक्षण यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो, असे सांगत त्यांनी त्यांना एक सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून गौरवले.

तसेच, चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी मुनगंटीवार यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. पायाभूत सुविधा, सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रम आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांनी लोकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे, असे त्यांनी नमूद केले. “अशा नेतृत्वाची साथ लाभणे ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे,” असे सांगत त्यांनी त्यांच्या कार्यामागील सेवाभाव, समर्पण आणि सातत्यपूर्ण परिश्रम अधोरेखित केले.

Sudhir mungantiwar : गुढीपाडव्याला कष्टकऱ्याला दिली नवी उभारी; मुनगंटीवारांकडून हातठेला भेट

कार्यक्रमाच्या शेवटी “आज तुमच्यासोबत हा मंच शेअर करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी केवळ एक क्षण नाही तर आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव आहे,” असे भावनिक उद्गार काढत प्रार्थना बेहरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनीही त्यांच्या वक्तव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

घुग्घुसमधील या सांस्कृतिक महोत्सवाने केवळ मनोरंजनाची मेजवानीच दिली नाही, तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सकारात्मक संवादालाही चालना दिली. विशेषतः सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्याविषयी व्यक्त झालेली आदराची भावना या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

__

___