Sudhir Mungantiwar : ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करून एसीबीमार्फत चौकशी करा

MLA Sudhir Mungantiwar demanded ln Assembly, Minister instructions for immediate transfer : आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी, तात्काळ बदलीचे मंत्र्यांचे निर्देश

Mumbai : ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, संबंधित अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करून एसीबीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच शिस्त व पारदर्शकतेची अपेक्षा असते; मात्र या प्रकरणात झालेल्या कथित अनियमितता आणि निष्काळजीपणामुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यावर शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, असेही आ.मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

रेतीसारख्या संवेदनशील विषयात प्रशासनाची भूमिका प्रश्नांकित करणारी गंभीर बाब समोर आली असून, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबत आ. विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले. या चर्चेत सहभाग घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांची दादागिरी आणि गैरव्यवहारावर प्रहार केला. आणि अशा व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी सरकारने ठाम आणि ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी अशी मागणी लावून धरली,

Sudhir Mungantiwar : लक्ष्यवेधींची उत्तरे प्रलंबित ठेवल्यास मुख्य सचिवांवर हक्कभंग!

अवैधरित्या होत असलेल्या रेती वाहतुकीप्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई न करता केवळ किरकोळ दंड आकारून ट्रॅक्टर सोडून देण्यात आल्याने कर्तव्यात कसूर झाल्याचा आणि आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या संदर्भातील फाईल तब्बल ३२ दिवस डीजी कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आल्याने प्रशासकीय कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Sudhir Mungantiwar : जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभेत मुनगंटीवार आक्रमक

या प्रकरणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ठाम भूमिका विधानसभेत मांडत संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी केली. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी तातडीने विभागीय चौकशी सुरू असून, अहवाल प्राप्त होताच तात्काळ निलंबन करून एसीबीमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वस्त केले.तसेच अधिकाऱ्याची तत्काळ बदली करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.