व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधुनिक भगीरथ ठरले सुधीर मुनगंटीवार; राजोलीच्या...

पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधुनिक भगीरथ ठरले सुधीर मुनगंटीवार; राजोलीच्या शेतकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त!

गोसेखुर्दचे पाणी शिवारात आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल; आनंद ठिकरे यांनी व्यक्त केल्या भावना

Chandrapur : पुराणकाळात राजा भगीरथाने आपल्या अथक प्रयत्नांतून गंगेला पृथ्वीवर आणल्याची कथा आपण श्रद्धेने ऐकतो. आज दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या शिवारात गोसेखुर्दचे पाणी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची तुलना आधुनिक भगीरथाशी केली जात आहे. पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्दच्या पाण्याची आशा निर्माण झाल्याने राजोली येथील शेतकरी आनंद ठिकरे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शेती हा केवळ उदरनिर्वाहाचा व्यवसाय नसून शेतकऱ्यांच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या कष्टांचा, स्वप्नांचा आणि जगण्याच्या आशेचा आधार आहे. मात्र, पावसाच्या अनिश्चिततेमुळे अनेकदा शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतशिवाराला सिंचनाच्या पाण्याचा आधार मिळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण होण्यासारखे आहे. याच भावनेतून गोसेखुर्दचे पाणी पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना आनंद ठिकरे यांनी व्यक्त केली.

मुनगंटीवार म्हणाले, पदवीधरांचा हुंकार विधानपरिषदेत घुमवा, सुधाकर कोहळेंना बहुमताने निवडून द्या !

‘गंगेला पृथ्वीवर आणणाऱ्या भगीरथाची कथा आपण ऐकली; आज शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी आणण्यासाठी झटणाऱ्या सुधीरभाऊंच्या कार्यात आधुनिक भगीरथाचे दर्शन घडते,’ अशा शब्दांत त्यांनी सुधीरभाऊंच्या प्रयत्नांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे, त्यांच्या कष्टांना आधार मिळावा आणि त्यांच्या जीवनात समृद्धी यावी, यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. गोसेखुर्दचे पाणी म्हणजे केवळ सिंचनाची सुविधा नसून शेतकऱ्यांच्या घामाला मोल मिळण्याची, शेतीला नवी उभारी मिळण्याची आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी येण्याची आशा आहे.

या महत्त्वाच्या कामासाठी विवेक ठिकरे, गजाननभाऊ वलकेवर, प्रमोदजी कडस्कर, विजयभाऊ पाखमोडे, श्रीधरजी पाखमोडे, श्रावण पाटील गोबाडे आणि हितेशजी ठिकरे यांनी केलेल्या प्रयत्नांचे आनंद ठिकरे यांनी विशेष कौतुक केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येऊन सातत्याने प्रयत्न करण्याची या सर्वांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या कामासाठी तांत्रिक पातळीवर प्रयत्न करणारे उपअभियंता पिंगडे साहेब, उपअभियंता गुगल साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी वर्गाचेही त्यांनी आभार मानले. संबंधित अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या कामाच्या दिशेने पुढे जाण्यास मदत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शेतकरी संकटात तर मुनगंटीवार सर्वांत पहिले मैदानात; समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा

 

नेत्याचा पाठपुरावा, सहकाऱ्यांची तळमळ, अधिकाऱ्यांचे योगदान आणि शेतकऱ्यांची एकजूट यांतूनच विकासाची नवी वाट निर्माण होते. गोसेखुर्दच्या पाण्याने पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिवारात हिरवळ फुलावी, शेतकऱ्यांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी आणि त्यांच्या कष्टांना भरभराटीची फळे मिळावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत आनंद ठिकरे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.गंगाजलाच्या प्रतीकाप्रमाणे गोसेखुर्दचे पाणी शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य घेऊन यावे, त्यांच्या शिवारात समृद्धीची हिरवळ नांदावी आणि पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाला नवी दिशा मिळावी, हीच या भागातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

—-

error: Content is protected !!