New hope for lakhs of patients, praises Chief Minister Devendra Fadnavis : लाखो रुग्णांसाठी नवे आशास्थान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
Chandrapur : चंद्रपूर आणि गडचिरोलीसह विदर्भातील दुर्गम व आदिवासीबहुल भागासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरणार असून महाराष्ट्र शासन आणि टाटा समूहाच्या सहकार्यातून उभारण्यात आलेल्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे २२ डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. हे हॉस्पिटल केवळ एक आरोग्य केंद्र नसून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या लाखो रुग्णांसाठी नवे आशास्थान ठरणार आहे. सुधीरभाऊंच्या तळमळीतून कॅन्सर हॉस्पिटल उभे झाले. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर परिसरात कॅन्सरवरील उपचारांसाठी वेळेवर, सुलभ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध नसणे ही दीर्घकाळची मोठी समस्या होती. ही गरज ओळखून राज्य शासनाने पुढाकार घेत टाटा समूहासारख्या विश्वासार्ह सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभे केले आहे. या रुग्णालयामुळे आता रुग्णांना उपचारांसाठी नागपूर, मुंबई किंवा इतर दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी ठरवलं… आणि ‘होणार नाही’ हे अशक्य !
या कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीत राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दाखवलेली तळमळ, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि दूरदृष्टी विशेष उल्लेखनीय असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. सातत्याने पत्रव्यवहार, पाठपुरावा आणि शासनस्तरावर प्रभावी भूमिका बजावत मुनगंटीवार यांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात मोलाची भूमिका बजावली. लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर समाजाप्रती असलेल्या जबाबदारीतून त्यांनी हे कार्य केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Sudhir Mungantiwar : बंगाली समाजाच्या विकासासाठी मुनगंटीवारांचे मोठे पाऊल!
२२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या सेवाकार्याला नैतिक अधिष्ठान मिळणार असून राष्ट्रसेवा, समाजकल्याण आणि मानवी मूल्यांचा संदेश अधिक व्यापक पातळीवर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे हे राज्य शासनाचे ध्येय असून चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल हे त्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकल्पात योगदान देणाऱ्या टाटा समूहातील वैद्यकीय तज्ज्ञ, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले असून लोकार्पण समारंभास हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.
___








