Paddy growers in Chandrapur district will get water from Gosikhurd : गोसीखुर्द प्रकल्प मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले निर्देश
Chandrapur : यावर्षी आतापर्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. धान पिकासाठी जीवनदायी ठरणारे पाणी वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. वेळेवर पाणि न मिळाल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. असे होऊ नये म्हणून राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गोसिखुर्द प्रकल्पातील आरक्षित तलावातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी गोसिखुर्द प्रकल्प मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना केली आहे.
आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील धान पिकाचा प्रमुख पट्टा असलेल्या मुल, चिमूर, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, गोंडपिंपरी आणि इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी कार्यवाही सुरू झाली आहे. गोसिखुर्द प्रकल्पातील पाणी आसोलामेंढा तलावामध्ये सोडून शेतकऱ्यांना नहराद्वारे पाणी पुरवण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली आहे. तसे निर्देश त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेले आहेत.
Sudhir Mungantiwar : प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा लढा यशस्वी
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणारे आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पावसाळा अजून संपलेला नाही. पण धान पिकासाठी आवश्यक असलेला पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ही बाब चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना गोसिखुर्दचे पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेल्या मागणीबद्दल शेतकऱ्यांनी आमदार मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.