Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी तात्काळ धावून आले आ. सुधीर मुनगंटीवार

Showing sensitivity, the convoy stopped and helped the injured : संवेदनशीलतेची प्रचिती, ताफा थांबवून जखमींना केली मदत

Bhadravati : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला. त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. त्यानंतरच ते पुढच्या प्रवासाला निघाले. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ असे मानणारे आ. मुनगंटीवार यांची तत्परता पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जीवनातील प्रत्येक क्षण जनतेसाठी अर्पण केला आहे, याची प्रचिती भद्रावती येथे घडलेल्या अपघातातून पुन्हा आली. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना भद्रावती येथे एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती बल्लारपूर येथील प्रदीप डोके आणि घनश्याम मेश्राम जखमी झाले. त्याच वेळी नेमके त्या मार्गावरून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ताफा जात होता.

Sudhir Mungantiwar : फक्त सांस्कृतिक भवनाला मंजुरी देऊन थांबतील ते मुनगंटीवार कसले !

अपघातग्रस्तांची अवस्था पाहताच, ‘माणसाचे प्राण वाचवणे हेच सर्वोच्च कर्तव्य’ या भावनेतून क्षणाचाही विलंब न करता आ. मुनगंटीवार यांनी आपला ताफा तात्काळ थांबवला. स्वतः पुढाकार घेऊन जखमींना प्राथमिक उपचार मिळवून देत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. त्यांच्या तात्काळ पुढाकारामुळे अपघातग्रस्तांना जीवदान मिळाले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आणि महामंत्री मंगेश गुलवाडे यांनीही तत्परतेने मदत केली. त्यांनी जखमींना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी नेण्याची मदत केली.

Unique Honor : सुधीर मुनगंटीवार यांचा असाही चाहता, दिली अनोखी भेट !

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, ग्रामविकासासाठी सततचे प्रयत्न अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी जनतेच्या सेवेला नवी दिशा दिली आहे. त्यामुळेच “जनसेवा हीच ईश्वरसेवा” ही त्यांची जीवनव्रती भूमिका जनतेच्या मनाला स्पर्श करत राहते.जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे, संकटात मदतीचा हात देणारे संवेदनशील नेते म्हणजे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, हे पुन्हा यानिमित्ताने सिद्ध झाले.

___