Breaking

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी गाजवले अर्थसंकल्पीय अधिवेशन !

 

Sudhir Mungantiwar Forced the government to take decisions in the public interest : लोकहिताचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले, खरे लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहिले

न्यायासाठी ज्यांनी उठवली मशाल
विधान भवनात केली आयुधांची ढाल..
शब्द होते त्यांचे शस्त्र धारदार
सुधीरभाऊ लोकशाही खरे सरदार..!

Mumbai सुधीर मुनगंटीवार म्हणजे अभ्यासू आणि दमदार नेतृत्व. मंत्री असताना त्यांनी सरकारची भूमिका जबाबदारीने मांडली. विरोधी पक्षात असताना सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. आज ते फक्त आमदार आहेत. पण आमदारकी म्हणजे एक पद नव्हे, तर ती एक जबाबदारी आहे, याची कमालीची जाणीव त्यांना आहे. ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. सभागृहात जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी विविध आयुधे वापरून मांडले. त्यातून त्यांनी सरकारकडून जनहिताचे निर्णय करवून घेतले. काही निर्णयांसाठी आश्वासनांची घोषणाही झाली. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकहिताचे राजकारण करतात, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. एक खरे लोकप्रतिनिधी म्हणून ते संपूर्ण अधिवेशनात उभे राहिले. सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात, जनतेचे प्रश्न मांडणे हेच आपले खरे कर्तव्य आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून स्पष्ट केले.

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा दरारा काही औरच आहे. मंत्री असताना तर त्यांचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाच आहे. पण आज मंत्रिपदावर नसतानाही एक आमदार म्हणूनही त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत कुठलाही बदल झालेला नाही. एक आमदार म्हणून त्यांनी विधीमंडळ सभागृहात केवळ मतदारसंघाच्याच नाही, तर राज्यभरातील समस्यांना वाचा फोडली. संसदीय आयुधांचा योग्य वेळी, योग्य पद्धतीने कसा वापर करायचा, हे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडूनच शिकावे.

Sudhir Mungantiwar : आधी २०२ कोटींचा विक्रमी पिक विमा अन् आता मिळवून दिला धानाचा बोनस !

चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोलफिल्ड्स लि.च्या WCL कोळसा खाणीमुळे तसेच जिल्ह्यातील उद्योगांमुळे होणाऱ्या जल व वायू प्रदूषणाच्या समस्येसंदर्भात मुनगंटीवार यांनी संसदीय ब्रम्हास्त्र उपसले आहे. हे ब्रम्हास्त्र म्हणजे विधानसभा विनंती अर्ज होय. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपुरात येऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. गोंड राजवटीचा वारसा जपण्यासाठी झरपट नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवनाची चंद्रपूरकरांची मागणी पूर्ण करवून घेतली. यापूर्वी इरई नदीचा प्रश्नही त्यांनी निकाल काढला. अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७ कोटी ६५ लाख ३३ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यास सरकारला भाग पाडले. चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी ६० कोटी ७६ लाख रुपये मंजूर करवून घेतले. राज्यातील बोगस बियाणे विक्रीवरही त्यांनी कडाडून प्रहार केला.

सरकारला सुचवले उत्पन्नाचे स्त्रोत..
प्राप्त उत्पन्नात सरकार व्यवस्थित चालू शकणार नाही, हे २०१४ ते २०१९ या काळात अर्थमंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या चाणाक्ष बुद्धीने हेरले होते. त्यामुळे सरकारचे उत्पन्न वाढवण्याचे विविध मार्ग त्यांनी सरकारला सूचवले. याने विद्यमान अर्थमंत्री इतके प्रभावित झाले की, त्यांनी मुनगंटीवारांनाच त्या समितीचे अध्यक्ष बनवले. ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला चमकवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि वीर बाबुराव शेडमाके स्टेडियमच्या क्रीडा संकुलासाठी १३७ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील उपकेंद्रासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ४१४ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी जाहिर केला. यासाठी मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतकरी आणि ग्रामीण जिवनाशी निगडीत असलेल्या शंकरपटाला राजाश्रय देण्याची मागणी त्यांनी रेटून धरली.

विधानसभा अध्यक्षांनी केला गौरव..
सांस्कृतिक कार्यमंत्री असताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट निर्मितीचा शासनादेश काढला होता. या आदेशाची त्यांनी विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना अलीकडेच आठवण करून दिली. आता लवकरच या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू होणार आहे. सभागृहात सर्व मुद्दे त्यांनी इतक्या प्रभावीपणे मांडले की ‘सुधीर मुनगंटीवार यांच्या मुद्द्यात मेरीट आहे’, असे म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा सभागृहात गौरव केला.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर लागणार एसआयटी !

भिंतींनी ऐकला वेगळा सूर
अर्थसंकल्पीय अधिवेशनात संविधानावर चर्चा झाली. या विषयी तर काळजाला भिडणारे, जनतेच्या भावना मांडणारे आणि राज्याच्या आत्म्याशी नाळ जोडणारे त्यांचे भाषण एका कणखर, पण भावूक नेतृत्वाचे दर्शन होते. सामान्य जनतेचा आवाज बनलेले मुनगंटीवार प्रत्येक वाक्यातून दिसत होते. सामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्यातील विषयांनीच त्यांनी भाषणाला सुरुवात केली.

Sudhir Mungantiwar : आपल्या मनातील राम-रावणाच्या युद्धात रामच जिंकावा, ही गायत्री परिवाराची शिकवण !

संविधान आणि लोकशाहीवर ठाम विश्वास
“मतभेद असू शकतात, पण मनभेद नकोत,” हे सांगताना त्यांनी सभागृहात एक प्रकारचा स्नेहभाव निर्माण केला. समजूतदार भूमिका घेऊन आपले म्हणणे मांडत होतेच, शिवाय विरोधकांचंही ऐकत होते. त्यांची ही भूमिका एका संयमी, व्यापक दृष्टीकोन असलेल्या नेत्याची होती – ज्याला भांडण नको, पण समविचारांची बैठक हवी आहे. विधानसभेत सामान्य जनतेच्या अडचणी लक्षात घेत, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले भाषण म्हणजे जनतेच्या मनातली जिवंत धग होती, असं बोललं जात आहे.