Sudhir Mungantiwar : मुल नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात मुनगंटीवारांनी गाजवली सभा !

Sudhir Mungantiwar held a public meeting in Mul : रिंकू राजगुरूंच्या उपस्थितीने रंगली सभा,

Mul – Chandrapur : मुल येथे आज सायंकाळी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या जाहिर सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु, सभेचे मुख्य आकर्षण ठरली ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू. मंचावर रिंकू दिसताच उपस्थितांनी जल्लोष केला. सैराट फेम रिंकू राजगुरू म्हणजे आर्ची तुमच्या भेटीला आली आहे, असे म्हणत मुनगंटीवारांनी आर्चीचे स्वागत करत कार्यक्रमाला वेगळ्याच उत्साहाची देणगी दिली.

महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की, तुमचा पुढचा आशा चित्रपटही सुपरहिट व्हावा, अशा शुभेच्छा रिंकू राजगुरू यांना दिल्या. यानंतर सभेचा माहोल आणखी रंगत गेला. रिंकूची उपस्थिती हा भाजपच्या प्रचाराला टाकलेला दमदार ‘तडका’ असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. सभेतील उत्साह वाढवताना मुनगंटीवारांनी विनोदी शैलीत मतदारांना आवाहन केले. भाजपला मत दिलं नाही तर रिंकू म्हणेल की, मराठीत सांगितलं तर कळत नाही का? इंग्रजीत सांगू का? अशी सफाईदार कोटी मारत त्यांनी गर्दीत हशा पिकवला. या संवादांचा प्रभावी वापर करत त्यांनी संदेश दिला की चुकीचा निर्णय घेतल्यास पाच मिनिटांची चूक पाच वर्ष भोगावी लागते.

Sudhir Mungantiwar : मुल जाहिरसभेत मुनगंटीवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल !

यावेळी विकासाचा मुद्दा कायम अग्रणी ठेवत,नगर परिषदेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेसवर टीका करत ते म्हणाले, काँग्रेस येथे सत्तेत आली, तर नगरपरिषदेची तिजोरी भरणारच नाही. उलट कराचा भार नागरिकांवर वाढेल. त्याउलट, भाजपच्या उमेदवारांना निवडून दिल्यास विकासाचा निधी सतत खेचून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. किरणताई कापगते निवडून आल्यावर पुढील पाच वर्ष निधीचा वर्षाव होत राहील, अशा शब्दांत त्यांनी भाजप उमेदवारांना मिळणारा शासनाचा थेट लाभ स्पष्ट केला.

RTO Department : HSRP साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; त्यानंतर नो एक्स्टेन्शन, थेट दंड !

काँग्रेसवर आणखी कठोर प्रहार करत मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवारही नाही. उधारीवर उमेदवार घेऊन निवडणूक लढत आहेत. हीच त्यांची अवस्था आहे. मुल शहरातील ही सभा रिंकू राजगुरूच्या उपस्थितीसह मुनगंटीवारांच्या आक्रमक, विनोदी आणि विकासाभिमुख भाषणामुळे लक्षवेधी ठरली. आगामी नगरपरिषद निकालात ही सभा निश्चितच प्रभाव टाकेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.