Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या विधानसभेतील गावाने केली कमाल !

Uthalpeth Sauragram; A new benchmark in development by obtaining ISO certification : उथळपेठ सौरग्राम; आयएसओ मानांकन मिळवत विकासात नवा मानदंड !

Chandrapur : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील उथळपेठ गावाने विकासाच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. 100 टक्के सौरऊर्जेवर आधारित ग्राम म्हणून आधीच राज्यात ओळख निर्माण केलेल्या उथळपेठने आता प्रशासकीय शिस्त, पारदर्शक कारभार आणि दर्जेदार कामकाजाच्या जोरावर आयएसओ प्रमाणपत्र मिळवून इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली उथळपेठचा हा सर्वांगीण विकास शक्य झाला आहे.

उथळपेठ ग्रामपंचायतीने सुसज्ज इमारत, अद्ययावत कार्यालयीन व्यवस्था, दस्तावेजांचे योग्य संगोपन, सीसीटीव्ही यंत्रणा, समित्यांचे नियोजनबद्ध कामकाज, पक्के रस्ते व गटार व्यवस्था अशा विविध निकषांची प्रभावी अंमलबजावणी केली. या सर्व बाबींची दखल घेत ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन बहाल करण्यात आले. सौरग्राम प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत, पर्यावरणपूरक विकास आणि गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग हे या यशाचे प्रमुख घटक ठरले आहेत.

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्री म्हणाले, सुधीरभाऊंच्या तळमळीतून उभे झाले चंद्रपूरचे कॅन्सर हॉस्पिटल !

उथळपेठने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 100 टक्के सौर ऊर्जित ग्राम प्रकल्प यशस्वीपणे राबवला असून सर्व घरांवर सौर पॅनल उभारून मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पामुळे गावातील शेकडो कुटुंबांना थेट लाभ मिळाला असून उथळपेठ महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचे सौरग्राम म्हणून ओळखले जाते.

Sudhir Mungantiwar : अडथळ्यांनाही न जुमानता, मुनगंटीवारांचा वेग कायम!

या यशाबाबत माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, गावकऱ्यांचा सहभाग आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे उथळपेठचा विकास वेगाने झाला. सौरऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असतानाच आयएसओ मानांकन मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे. उथळपेठचा हा विकास मॉडेल इतर गावांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दणका,ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची बदली !

उथळपेठच्या यशानंतर परिसरातील इतर गावांनीही सौरग्राम आणि प्रशासकीय सुधारणा राबवण्याचा निर्धार केला असून ग्रामीण विकासाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात मानली जात आहे.

___