Sudhir Mungantiwar : ५३२ जीवनांना नवा प्रकाश: मुनगंटीवारांचा उपक्रम ठरला सेवाभावाचा दीप !

Through the initiative of MLA Sudhir Mungantiwar, 532 citizens saw a new world of light. : ४,००० तपासण्या, ५३२ यशस्वी शस्त्रक्रिया; दृष्टी, संवेदना आणि सेवा यांची उज्ज्वल कथा

Ballarpur – Chandrapur : समाजकार्यातील संवेदनशीलता, सातत्यपूर्ण धडपड आणि जनतेप्रती निःस्वार्थ कर्तव्यभावना यांचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघात राबविलेली भव्य ‘मोतीबिंदू निर्मूलन मोहीम’. गेल्या तीन महिन्यांत या मोहिमेने हजारो कुटुंबांच्या जीवनात उजेडाची नवी किरणे जागवली आहेत.

मतदारसंघातील विविध गावांमध्ये आठवड्याच्या शेवटी नियमित आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये तब्बल ४,००० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी दृष्टी अती गंभीररीत्या बाधित झालेल्या ५३२ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया नागपूर येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात पूर्णतः मोफत करण्यात आली. विशेष म्हणजे, रुग्णांना केवळ ऑपरेशनची सुविधा नव्हे तर प्रवास, निवास आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली.

Local body election : धक्कादायक प्रकार; 1 कोटीत नगरसेवक पदाचा लिलाव?

अनेक रुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे वर्षानुवर्षे उपचार मिळत नव्हते; परंतु या लोककल्याणकारी उपक्रमामुळे त्यांच्या आयुष्याला अक्षरशः नवजीवन प्राप्त झाले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी भावनिक कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, “मुनगंटीवार साहेबांनी केवळ डोळे उघडले नाहीत, तर आत्मविश्वास परत दिला. घर, कुटुंब, संसार पुन्हा स्पष्ट दिसू लागला.” ही मनापासून उमटलेली कृतज्ञता आमदार मुनगंटीवार यांच्या मोहिमेच्या यशाची साक्ष देणारी आहे.

कोणताही नागरिक उपचाराविना राहू नये हा आमदार मुनगंटीवार यांचा दृढ संकल्प आहे. जानेवारी २०२६ पासून या मोहिमेचा दुसरा टप्पा पुन्हा सुरू होणार आहे. गावागावांत मोफत तपासणी शिबिरे, वैद्यकिय मदत आणि आवश्यक शस्त्रक्रिया या सर्व सुविधा आगामी काळातही व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा संकल्प आहे.

Bhushan Gavai : मी मूळतः धर्मनिरपेक्ष; आंबेडकर, राज्यघटनेमुळेच आज या पदावर !

आरोग्य सेवेतील त्यांच्या कार्याचा व्यापक आवाका बघता, आतापर्यंत ३५ हजार नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण तसेच १५ हजारांहून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य करून देण्यात आल्या आहेत. जनतेसाठी सतत धडपडणाऱ्या आमदार मुनगंटीवार यांच्या या उपक्रमाने बल्लारपूरची ओळख ‘आरोग्यदृष्ट्या समृद्ध मतदारसंघ’ अशी निर्माण केली आहे. बल्लारपूरमध्ये आज प्रकाशाचे जे दिवे पेटले आहेत, ते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकाभिमुख कार्याची साक्ष देतात. ही फक्त मोहीम नाही; ही दृष्टी, संवेदना आणि सेवा यांची उज्ज्वल कथा आहे.