Chandrapur is transforming rapidly; a new story of development under Mungantiwar’s leadership : चंद्रपूरचा कायापालट; मुनगंटीवारांच्या कामांची राज्यभर चर्चा
Chandrapur एखाद्या कुशल शिल्पकाराने आपल्या कल्पकतेतून शहराचा कायापालट घडवावा, तसा चंद्रपूरचा बदल आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचा विस्तृत पट उलगडला. साकार झालेल्या प्रकल्पांपासून ते भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांपर्यंत त्यांनी मांडलेली दृष्टी ऐकताना क्षणभर थक्क व्हावे असेच चित्र निर्माण झाले.
“काय सांगता! हे सगळं खरंच चंद्रपुरात घडतंय” असे आश्चर्याचे उद्गार नकळत ओठांवर येतात. कारण, ज्या वेगाने आणि ज्या व्यापकतेने विकासकामांचा धडाका जिल्ह्यात सुरू आहे, ते पाहता चंद्रपूर एका नव्या उंचीवर झेपावत असल्याची जाणीव होते. हे पाहून थक्क व्हाल, हे मात्र नक्की. हा विकासाचा प्रवास आहे, आणि त्यात बदलाची ताकद स्पष्ट जाणवते. या प्रवासामागे ठामपणे उभे राहिलेले एकच नाव म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार.
Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांची दूरदृष्टी ठरली टर्निंग पॉइंट,चंद्रपूरात ‘ज्ञानगंगा’
लघुउद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या “अमृतपेठ 2026” सारख्या उपक्रमांमुळे स्थानिक व्यवसायांना नवे व्यासपीठ मिळत आहे. त्याचबरोबर हजारो युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या क्षेत्रांतही भरीव गुंतवणूक होत असून, या सर्व उपक्रमांमुळे चंद्रपूरच्या विकासाला नवी गती मिळताना दिसत आहे.
बल्लारपूरमध्ये उभारले जाणारे सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, मुल येथे उभारले जाणारे कृषी महाविद्यालय, पॉलिटेक्निकला मिळालेली मंजुरी, तसेच ८० कोटींचा कृषी हाट ही केवळ यादी नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी ठोस पावले आहेत. याशिवाय, ताडाळी येथे साकारत असलेला ५३ कोटींचा काष्ठ प्रक्रिया प्रकल्प हा उद्योग क्षेत्रात चंद्रपूरला राष्ट्रीय पातळीवर नेणारा गेमचेंजर ठरणार आहे.
आरोग्य क्षेत्रात मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर हॉस्पिटल, तर शिक्षण क्षेत्रात एसएनडीटी उपकेंद्रात सुरू होणारेराज्यातील पाहिले इंडियन नॉलेज सिस्टीम अभ्यासक्रम ही सर्व कामे चंद्रपूरला नवीन ओळख देत आहेत. महिलांसाठी ६२ कौशल्याधारित अभ्यासक्रम, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, आणि उद्योजकांसाठी CSR माध्यमातून मिळणारा निधी यातून ‘स्वावलंबन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरते आहे.
मर्यादांच्या चौकटीत अडकून न राहता मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती प्रत्यक्षात साकार करण्याचा आत्मविश्वास चंद्रपूरकरांमध्ये निर्माण करण्याचे काम मुनगंटीवार करत आहेत. केवळ विचारांपुरते न राहता कृतीतून बदल घडवण्याची प्रेरणा ते देत आहेत.
Sudhir mungantiwar : नांदेडच्या भाविकांची मुनगंटीवारांकडे धाव; हस्तक्षेपाने सुटला प्रश्न
आमदार म्हणून जिल्ह्यात विकास कसा खेचून आणायचा आणि तो प्रत्यक्षात कसा साकार करायचा, याचे भान मुनगंटीवार यांना चांगलेच आहे. विधानसभेत त्यांनी मांडलेले ठाम आणि अभ्यासपूर्ण मुद्दे केवळ भाषणापुरते मर्यादित नसून, त्यामागे चंद्रपूरच्या विकासाची प्रामाणिक तळमळ आहे. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प जिल्ह्यात आणले, आणि त्याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. त्यामुळेच त्यांच्या कामाची राज्यभर चर्चा होताना दिसते.
आज चंद्रपूर केवळ एक जिल्हा म्हणून मर्यादित राहिलेला नाही, तर राज्याच्या विकासाच्या नकाशावर झपाट्याने पुढे सरकणारा एक ध्रुवतारा ठरत आहे. मागील अनेक वर्षांची सुधीर मुनगंटीवार यांची तपश्चर्या, सातत्य आणि चंद्रपूरमध्ये बदल घडवण्यासाठी केलेला राज्यसरकारकडे पाठपुरावा आता प्रत्यक्षात फळाला येताना दिसत आहे.सुरू असलेल्या प्रकल्पांचा वेग, त्यांची व्यापकता आणि दिसून येणारा परिणाम पाहता हा बदल स्पष्ट जाणवतो… आणि म्हणूनच अनेकांच्या मनात एकच भावना उमटते ‘चंद्रपूर वेगाने बदलतंय’.








