Teachers constituency : या शिक्षक मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा!

sharad-pawar-ncp-claimis-amravati-teachers-constituency : प्रदेशाध्यक्षांकडे केली मागणी, अनुकुल वातावरण असल्याचा दावा

Akola आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या वाट्याला द्यावा, अशी मागणी पक्षाचे प्रदेश संघटक सचिव जावेद जकारिया यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश असून, हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शिक्षक वर्गामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून या विभागात पक्षाची संघटनात्मक ताकद सातत्याने वाढत असल्याचे जावेद जकारिया यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Pawar wealth : आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! राज्यसभा प्रतिज्ञापत्रात उघड झाली पार्थ पवारांची संपत्ती

महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चेदरम्यान अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वाट्याला देण्यात यावा आणि या मतदारसंघासाठी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Akola airport : आधी हवेत घोषणा, आता अर्थसंकल्पात ‘लँडिंग’

योग्य नियोजन, भक्कम संघटन आणि शिक्षक वर्गाचा वाढता पाठिंबा लक्षात घेता हा मतदारसंघ जिंकण्याची पूर्ण क्षमता पक्षात असल्याचा विश्वास जावेद जकारिया यांनी व्यक्त केला. तसेच या संदर्भात पक्ष नेतृत्वाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.