Draft voter list of the Amravati Division Teachers’ Constituency released : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर
Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नवीन प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून त्यात एकूण २९,८१६ मतदारांची नोंद झाली आहे. २०२० मधील निवडणुकीवेळी मतदारसंख्या ३५,६२२ इतकी होती, त्यामानाने यंदा ५,८०६ मतदारांनी घट झाल्याचे चित्र आहे.
विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. श्वेता सिंघल यांनी ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. प्रारूप यादीवरील दावे-हरकती नोंदविण्यासाठी ३ ते १८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ५ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व आक्षेप निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
प्रारूप यादीसाठी विभागातून एकूण ३०,८६५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २९,८१६ अर्ज पात्र ठरले असून त्यात २१,०७४ पुरुष आणि ८,७४२ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण १,०४९ अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून त्यात ५६४ पुरुष आणि ४८५ महिलांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
२०२० व २०२५ मतदारसंख्या तुलना
२०२० निवडणुकीतील मतदारसंख्या
एकूण मतदारसंख्या : ३५,६२२
अमरावती जिल्हा : १०,३८६
अकोला जिल्हा : ६,४८०
बुलढाणा जिल्हा : ७,४८४
वाशिम जिल्हा : ३,८१३
यवतमाळ जिल्हा : ७,४५९
२०२५ प्रारूप मतदारसंख्या (अर्हता दिनांक १ नोव्हेंबर २०२५)
एकूण मतदारसंख्या : २९,८१६
अमरावती जिल्हा : ८,१०४
बुलढाणा जिल्हा : ८,०५५
अकोला जिल्हा : ४,८८३
यवतमाळ जिल्हा : ५,७१४
वाशिम जिल्हा : ३,०६०
Balwant Wankhede : रेल्वे स्थानक स्थलांतर प्रस्तावावर खासदार बळवंत वानखडे आक्रमक
पुढील राजकीय संदर्भमतदारसंख्येतील घट शिक्षक संघटनांसाठी आणि राजकीय पक्षांसाठी रणनीती ठरविताना महत्त्वाचा संकेत ठरू शकतो. पुरवणी मतदार नोंदणीमुळे काही प्रमाणात संख्या वाढण्याची शक्यता असली तरी मुख्य यादीतील घट का झाली, यावर आता चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे.








