Trump tariffs : भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगापुढे ट्रम्प यांची टॅरिफ खेळी फोल

America will fall on its face! Ernst & Young report makes it clear : अमेरिका तोंडावर पडणार! अर्न्स्ट अँड यंगच्या रिपोर्ट मधून स्पष्ट

New Delhi : भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगापुढे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची 50 टक्के टॅरिफची धमकी फोल ठरणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. अर्न्स्ट अँड यंग इंडियाच्या नव्या अहवालानुसार भारताचा वेग थांबवणं अशक्य आहे. उलट भविष्यात या निर्णयामुळे अमेरिकेलाच पश्चाताप करावा लागेल, असं स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

रिपोर्टनुसार, भारताने अनेक जागतिक आव्हानांवर मात करत पहिल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आपली जागा पक्की केली आहे. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 20.7 ट्रिलियन डॉलर (पीपीपी) पर्यंत झेपावेल, तर 2038 पर्यंत ती तब्बल 34.2 ट्रिलियन डॉलरच्या घरात पोहोचेल. त्यामुळे भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा आशावाद रिपोर्ट मध्ये व्यक्त केला आहे.

Nana Patole : नाना पटोलेंनी सुचवला मराठा आरक्षणावरील उपाय !

जगातील टॉप-5 अर्थव्यवस्थांच्या रेसमध्ये सध्या अमेरिका, चीन, जापान, भारत आणि जर्मनी यांचा समावेश आहे. यात भारत चौथ्या स्थानी असला तरी पुढील तीन-चार वर्षांत तो तिसऱ्या स्थानी झेपावेल, असा अंदाज वर्तवला आहे. अमेरिका अजूनही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, मात्र भारतीय वेगाकडे पाहता भविष्यात या समीकरणात मोठा बदल होऊ शकतो.

Chandrashekhar Bawankule : काँग्रेस नेत्यांची भूमिका नेहमीच गोंधळलेली !

भारताची ताकद काय? तर युवा लोकसंख्या, सतत वाढती देशांतर्गत डिमांड, तंत्रज्ञानातील प्रगती आणि टिकाऊ आर्थिक दृष्टिकोन. ही कॉम्बिनेशन भारताला दीर्घकालीन वाढीचा मजबूत पाया देत आहे. याउलट जर्मनी आणि जापानसारखे प्रगत देश मोठ्या प्रमाणावर जागतिक व्यापारावर अवलंबून असल्याने त्यांना अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. चीन जरी 2030 पर्यंत 42.2 ट्रिलियन डॉलर जीडीपी (पीपीपी) गाठेल असा अंदाज असला, तरी वृद्धत्वाकडे झुकणारी लोकसंख्या आणि वाढतं कर्ज ही मोठी आव्हानं त्याच्या आड येऊ शकतात.

Centers firm stance : राष्ट्रपती – राज्यपालांच्या निर्णयांविरोधात याचिकेचा अधिकार नाही !

अहवालानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेवर अमेरिकेच्या टॅरिफचा विशेष परिणाम होणार नाही. देशांतर्गत डिमांडमुळे भारतीय बाजारपेठ मजबूत आहेच, शिवाय तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या संधींमुळे जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताचा आत्मविश्वास कायम आहे. EY चा अहवाल म्हणजे भारताच्या आर्थिक सामर्थ्याची ठोस पावती असून, अमेरिका–भारत आर्थिक संबंधांमध्ये नव्या समीकरणांची चाहूल यातून मिळते आहे.
____