Demand Made to the Government to Clear the 7/12 Land Records : बुलढाण्यात ‘संपूर्ण सातबारा कोरा करा’ची घोषणा
Buldhana शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ठाकरे गटाची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरली आहे. अतिवृष्टी, पीकविमा, सातबारा कोरा आणि थकबाकीमुक्तीच्या मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यात एकाच वेळी ठिकठिकाणी शिवसेनेने जोरदार आंदोलन छेडले. तहसील कार्यालयांपुढे घोषणांनी आभाळ दणाणले, तर ठाकरे सेनेच्या या आंदोलनामुळे प्रशासनही सतर्क झाले.
बुलढाण्यात शिवसैनिकांचा ‘सातबारा कोरा’ घोषणांनी गाजलेला मोर्चा
बुलढाणा तहसीलसमोर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या वेळी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत “संपूर्ण सातबारा कोरा करा, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या, पंचनामे न करता पीकविमा तात्काळ जमा करा” अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
Attack on CJI : त्या वकिलावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जिल्हा संघटनेची मागणी
आंदोलनात उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संपर्कप्रमुख डी.एस. लहाने, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, नारायण हेलगे, संजय शिंदे, अनिकेत गवळी, राहुल जाधव आदींसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले.
बुधवत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले —
“शासन शेतकऱ्यांना दिलासा देत नसल्यास ठाकरे सेना रस्त्यावर उतरून सरकारला झोपेतून उठवेल!”
चिखलीत ‘हंबरडा मोर्चा’; तहसील कार्यालयावर प्रचंड गर्दी
चिखली येथेही ठाकरे सेनेने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हंबरडा मोर्चा’ काढला.
तहसील कार्यालयावर प्रचंड गर्दी झाली असून, तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्चात उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर, तालुकाप्रमुख किसन धोंडगे, किसान सेना जिल्हाप्रमुख वसंतराव झाल्टे, शिवसेना शहरप्रमुख श्रीराम झोरे, शहर संघटक प्रीतम गैची, युवा सेना तालुकाप्रमुख गजानन पवार, माजी नगरसेवक श्याम शिंगणे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले.
Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission (VNSSM) : सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे
शासनाकडे ठाकरे सेनेच्या प्रमुख मागण्या:
संपूर्ण सातबारा कोरा करावा,
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५०,००० भरपाई द्यावी,
पंचनाम्याशिवाय पीकविमा रक्कम थेट बँक खात्यात जमा करावी,
शेतकरी कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा निर्णय तत्काळ घ्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.








