व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray Shivsena : आधी नाकारले, आता थेट जिल्हाप्रमुख केले; चर्चा तर...

Uddhav Thackeray Shivsena : आधी नाकारले, आता थेट जिल्हाप्रमुख केले; चर्चा तर होणारच!

Mukesh Murumkar is new district president of Uddhav Thackeray Shivsena : मुकेश मुरुमकार यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी जबाबदारी

Akola शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पूर्वी नाकारण्यात आलेल्या मुकेश मुरुमकार यांनाच पुन्हा संधी देत अकोट व मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुखपदी नियुक्त करण्यात आली आहे.

ही नियुक्ती आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकारातून करण्यात आली असून, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात मुरुमकार यांना नियुक्ती देण्यात आली. यावेळी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुकेश मुरुमकार यांनी यापूर्वीही स्थानिक पातळीवर संघटनात्मक काम केले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. अकोट आणि मूर्तिजापूर या दोन्ही विधानसभा क्षेत्रात पक्ष बळकट करण्यासाठी मुरुमकार यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “पक्षविस्तारासाठी कार्यकर्त्यांना संधी देणे गरजेचे आहे. मुकेश मुरुमकार यांच्याकडे संघटन क्षमता असून, त्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास आहे.”

India economy : जागतिक बँकेकडून जीडीपी वाढीचा अंदाज, आंतरराष्ट्रीय बाजारातून दिलासादायक संकेत

दरम्यान, या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, ‘आधी नाकारले त्यालाच पुन्हा संधी’ या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

जिल्हाप्रमुख पदासाठी योग्यता असूनही आधी उपजिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती दिल्यामुळे काही काळ मुकेश मुरुमकार हे सक्रिय राजकारणापासून दूर होते. आता त्यांच्या खांद्यावर दोन विधानसभा मतदार संघासाठी जिल्हाप्रमुखाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

Eknath shinde : “काम नाही तर पद नाही”; एकनाथ शिंदेंचा कठोर इशारा

यापूर्वी मंगेश काळे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. महानगरपालिकेतील पराभवानंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या चार नगरसेवकांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मुकेश मुरूमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

error: Content is protected !!