Uddhav Thackeray lashes out over the PM Modi–Eknath Shinde meeting : न्यायालयात सुरु असलेल्या प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
Mumbai पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्लीतील भेटीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर अंतिम सुनावणी सुरू असताना पंतक्षेत्राकडून “मी तुमच्या पाठीशी आहे,” असा संदेश देण्यावरून त्यांनी थेट न्यायालयात सुरु असलेल्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शिवसेना नेमकी कोणाची, याबाबत सर्वोच्च न्यायालयात सध्या अंतिम सुनावणी सुरू असून, उद्धव सेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. न्यायालयाच्या काही निरीक्षणांमुळे शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना बहाल केली जाऊ शकते, असा कयास लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी तातडीने दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मोदींनी एनडीएच्या खासदारांना “घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे,” असा संदेश दिल्याचे समोर आले.
याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी तातडीने पत्रकार परिषद घेत तीव्र रोष व्यक्त केला. न्यायालयात सुनावणी सुरू असताना गद्दारांना भेटणे आणि मी तुमच्या पाठीशी आहे, असा संदेश देणे हा न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रकार नाही का असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच, पंतप्रधानांनी गद्दारांना महत्त्व का द्यावे, असा सवाल उपस्थित करत संविधानानुसारच न्यायालयाने योग्य तो निकाल द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.








