व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण एकीकडे उत्सवाचा जल्लोष, दुसरीकडे बरखास्तीचा वार!

एकीकडे उत्सवाचा जल्लोष, दुसरीकडे बरखास्तीचा वार!

वंचित बहुजन युवा आघाडीच्या अकोला जिल्हा व तालुका कार्यकारिणी बरखास्त

Akola एकीकडे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या उत्सवाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत वंचित बहुजन युवा आघाडीची अकोला जिल्हा आणि सर्व तालुक्यांतील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील घोषणा केली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील युवा आघाडीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.

राजेंद्र पातोडे यांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, वंचित बहुजन युवा आघाडीची अकोला जिल्हा कार्यकारिणी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या युवा कार्यकारिणी गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ पासून तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्या पसंतीत चुरस, दुसऱ्या पसंतीत विजयाचा फैसला!

वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक रचनेत युवा आघाडीला महत्त्वाचे स्थान आहे. युवकांचे संघटन, पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे, अशी जबाबदारी युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर असते. अशा परिस्थितीत जिल्हा आणि सर्व तालुका कार्यकारिणी एकाच वेळी बरखास्त करण्याच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

काँग्रेसच्या काळात ‘यशोमती’चे प्रेम, भाजपच्या काळात ‘पुतना मावशी’चे!

मात्र, या कार्यकारिणी बरखास्त करण्यामागील नेमकी कारणे काय आहेत, याबाबत जारी करण्यात आलेल्या सूचनेत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. हा निर्णय संघटनात्मक पुनर्रचनेचा भाग आहे की अन्य काही कारणांमुळे घेण्यात आला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, या निर्णयानंतर अकोला जिल्ह्यात युवा आघाडीची नवी कार्यकारिणी कधी जाहीर होणार आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या कोणाकडे सोपविल्या जाणार, याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. नव्या नियुक्त्यांमधून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला कोणती दिशा मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

error: Content is protected !!