Vanchit Bahujan Aghadi : संघ आणि भाजपला एकही राजकीय पक्ष जिवंत ठेवायचा नाही

Prakash Ambedkar alleges that the RSS and the BJP are destroying political parties : ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, वंचितने लढा कायम ठेवण्याचे आवाहन

Akola “आरएसएस–भाजपचा राजकीय पक्ष संपवणे हा ठरवून राबवला जाणारा अजेंडा आहे. बिहारच्या निवडणुकीत त्याचे दर्शन सर्वांना झाले. काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते की नाही, याबद्दलच संभ्रम आहे. आरजेडीवर ‘कुटुंबाचा पक्ष’ अशी शिक्कामोर्तब राजकीय मोहीम सुरू असून त्याच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत,” अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी सातत्याने आरएसएस–भाजप यांच्या विरोधात लढत आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारसरणीचे अनुयायी, मानवतावादी आणि लोकशाहीवादी मतदारांनी या लढ्यात सहभागी होण्याची वेळ आली आहे.”

Bacchu Kadu : मित्र पक्षांना कमकुवत करणे हाच भाजपचा अजेंडा!

मतदारांना थेट आवाहन करत आंबेडकर म्हणाले, “वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा पर्याय नाही, तर प्रतिकाराची ताकद आहे. राज्यातील आगामी निवडणुकांमध्ये आमच्या उमेदवारांना मतदान करून विचारांच्या लढ्याला बळ द्यावे.”

Local Body Elections : काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून पैशांचा आरोप!

वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीसाठी काही ठिकाणी आघाडी केली आहे. मात्र ऐनवेळी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी व सदस्य पदांसाठी उमेदवारी दाखल केली असल्याने या आघाडीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर सुरुवात चर्चेचे ठरत आहे.