Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission (VNSSM) : सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे

Government Schemes Must Reach the Farmers : स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांनी प्रशासनाला दिले निर्देश

Buldhana केंद्र आणि राज्य शासनाने शेतकरीहितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र त्या योजनांचा खरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांनी दिले. ते बुधवारी सिंदखेड राजा तालुक्यातील विविध गावांच्या दौऱ्यावर बोलत होते.

या दौऱ्यात त्यांनी तालुक्यातील शेतकरी आत्महत्या, चारा लागवड, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि शासनाच्या मदतकारवाईचा आढावा घेतला. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहावे, योजनांची अंमलबजावणी गतीने व्हावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Ladki bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी !

हेलोंडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले की, “शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच चिया, रेशीम आणि चारा लागवडीकडे वळावे. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल. कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे, त्यामुळे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात सातत्यपूर्ण संवाद असला पाहिजे.”

त्यांनी पुढे म्हटले की, “तालुक्यात प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय आणि स्वयंरोजगाराला चालना देणे आवश्यक आहे. कर्जपुरवठा, बाजारपेठ, गोदाम सुविधा आणि प्रयोगशाळा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शेतकरी सक्षम होणे हेच माझे ध्येय आहे.”

Arvind Sawant : शिवसेनेचा स्वबळाचा नारा, पदाधिकाऱ्यांचा आग्रह

या बैठकीला तहसीलदार अजित दिवटे, तालुका कृषी अधिकारी भागवत किंगर, गटविकास अधिकारी अभिजित बांगर, पोलीस निरीक्षक अमोल इंगळे, भास्कर घुगे, तसेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी जीवन राठोड उपस्थित होते.