Congress protests over the India–United States agriculture agreement : भारत-अमेरिका कृषी करारावरून काँग्रेस आक्रमक; शेतकरी हितासाठी बुलढाण्यात आंदोलन
Buldhana केंद्र सरकारच्या भारत-अमेरिका कृषी कराराविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी गांधी भवन येथे ‘न्याय सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. या वेळी “शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण” असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विश्वदीप पडोळ यांनी करत करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
पडोळ म्हणाले की, भारत-अमेरिका कृषी करारामुळे अमेरिकेतील सोयाबीन, मका, कापूस आणि दुग्धजन्य उत्पादने भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य दर मिळणार नाही आणि त्यांना कवडीमोल भावात माल विकावा लागेल. हा करार शेतकरीविरोधी असून केंद्र सरकारने तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवराज पाटील यांनीही करारावर टीका करत, अमेरिकन कृषी उत्पादनांना शून्य टक्के आयात शुल्क देण्याचा प्रस्ताव भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार असल्याचे सांगितले. स्वस्त परदेशी मालामुळे देशातील कृषी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असे ते म्हणाले.
Nana Patole : महिला आरक्षणाच्या आडून भाजपला आणायचा होता ‘मनुवाद’; नाना पटोलेंचा घणाघात
राज्यभर सुरू असलेल्या ‘शेतकरी न्याय’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील या आंदोलनात शेतकरी हिताच्या विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये शेतकरीविरोधी युएस ट्रेड डील त्वरित रद्द करणे, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी देणे, तसेच देशाचा संवेदनशील डेटा परदेशात न देण्याची मागणी यांचा समावेश होता. आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
Devendra fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, खरात, धर्मांतर, ड्रग प्रकरणांचा आढावा
या वेळी काँग्रेसचे संघटन सृजन अभियान समन्वयक अब्दुल हनान, सह-समन्वयक वीरेंद्र जगताप, काँग्रेस नेते संदीप शेळके, तेजेंद्रसिंग चव्हाण, धनंजय देशमुख, लक्ष्मणराव घुमरे, समाधान सुपेकर, समाधान आकाळ, देवानंद पवार, अमर कुळे, अचल दिपके, गौरव नाईक, तुषार खरे, संदीप पैठणे, ज्ञानेश्वर डांबरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






