Vidarbha Farmers : सेनगावमध्ये शेतकरी नेत्यावर ‘खोटे गुन्हे’?

False cases filed against a farmer leader in Sengao : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Buldhana सेनगाव पंचायत समितीकडून सिंचन विहीर व गोठा अनुदान न दिल्याचा जाब विचारल्यामुळे शेतकरी नेते गजानन कावरखे यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या प्रकरणात दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी संघटनेने 3 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनानुसार, 26 नोव्हेंबर रोजी गजानन कावरखे, विजय वानखेडे आणि प्रवीण मते हे शेतकरी बांधव व घरकुल लाभार्थ्यांसोबत कामानिमित्त सेनगाव पंचायत समिती कार्यालयात गेले असता कार्यालयातील कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. संविधान दिन व 26/11 शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम दुपारी 1 पर्यंत न झाल्याचे निदर्शनास आले. माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनद्वारे देण्यात आली.

Tapovan trees : तुम्हाला निवडून दिलं म्हणून काहीही करण्याचे अधिकार मिळाले का?

यानंतर, गटविकास अधिकाऱ्यांनी “शासकीय कामात अडथळा” इत्यादी विविध कलमांखाली कावरखे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप संघटनेने केला.

संघटनेचे म्हणणे आहे की, दाखल झालेले गुन्हे पूर्णपणे खोटे व तथ्यहीन आहेत. गटविकास अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय गुन्हे त्वरित मागे घेण्यासंदर्भातही निवेदनात उल्लेख आहे. अन्यथा बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Meeting of MPs : महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक

निवेदन देताना अमोल मोरे, महेंद्र जाधव, गजानन बापू देशमुख, सुरेश पवार, आमीन खांसाब, सतीश सुरडकर, नितीन सोनटक्के, पवन काकडे यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.