Vidarbha Farmers : सरकारचे दुर्लक्ष, संग्रामपूर तालुक्याला न्याय द्या!

Farmers outraged over exclusion from compensation for Rabi crop losses : रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईतून वगळल्याने शेतकऱ्यांचा संताप

Sangrampur राज्य शासनाने नुकताच रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १० हजार रुपयांची (कमाल ३ हेक्टर) आर्थिक मदत जाहीर केली. या योजनेत बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुके समाविष्ट करण्यात आले असले तरी संग्रामपूर तालुका वगळण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसिलदार यांच्यामार्फत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा जाधव यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खरीप २०२४ मध्ये संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वात कमी पिकविमा भरपाई मिळाली. सलग दोन हंगामांपासून हवामानातील अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने घोषित केलेल्या नुकसानभरपाई योजनेत संपूर्ण संग्रामपूर तालुका समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Local Body Elections : नगर पालिकांसाठी केवळ चार दिवस मिळणार प्रचाराला

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, खरीप २०२४ पिकविमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांना अजूनही पूर्ण लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच टप्प्यात विमा रक्कम वितरित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Local Body Elections : थेट नगराध्यक्षांसह १,१२२ सदस्यांसाठी होणार लढत!

या निवेदनावेळी प्रकाश भिसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी इशारा दिला की, “शासनाने संग्रामपूर तालुक्याशी अन्याय केला असून, निर्णयात सुधारणा न झाल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल.” शेतकऱ्यांच्या या हालचालीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरणही चांगलेच ढवळून निघाले आहे. स्थानिक जनप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे.