Vidarbha Farmers : अस्मानी संकटातील शेतकऱ्यांना सुलतानी मार

Hunger strike of farmers in Warud for crop insurance : पीकविम्यासाठी वरूडमध्ये शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Akola तालुक्यातील अतिवृष्टी, गारपीट, तसेच संत्रा-मोसंबी पिकाच्या विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बुधवारी सकाळी ११ वाजता युवानेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात किसान न्याय हक्क संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले.

प्रशासनाने शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ घेतल्याने आणि “हंगाम” हा चुकीचा शब्द वापरला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल २०२४ मध्ये लोणी आणि राजुरा बाजार महसुली मंडळांत गारपीट झाली होती. मात्र, शासन निर्णयातील “हंगाम” या शब्दामुळे या महसुली मंडळांतील शेतकऱ्यांना गारपीट अनुदान मिळाले नाही.

Wardha PWD : इंजिनिअरिंग डिग्रीचे बांधले तोरण!

जानेवारी २०२३ पासून सुरू असलेल्या आंबिया बहाराच्या संत्रा व मोसंबी पिकांना अतिवृष्टी आणि गारपीटचा फटका बसला. तसेच, जानेवारी २०२४ मध्ये दुसऱ्या हंगामाचे संत्रा-मोसंबी उत्पादन सुरू झाले असताना एप्रिल २०२४ मधील गारपिटीमुळे या पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे दोन्ही वर्षांतील नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एक रुपयांत पीकविमा घेतला. परंतु अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतरही शासन आणि विमा कंपनीने अद्याप नुकसानभरपाई दिलेली नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या फळगळती अनुदान योजनेत लोणी आणि राजुरा बाजार महसुली मंडळांचा समावेश करण्यात आलेला नाही. शासन निर्णयात कोणत्याही वगळण्याचा उल्लेख नसतानाही तहसील प्रशासनाच्या पातळीवर ही दोन्ही महसुली मंडळे वगळण्यात आली. त्यामुळे या महसुली मंडळांचा तातडीने फळगळती अनुदान योजनेत समावेश करावा.

मागील वर्षी संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी १२,००० रुपये विमा हप्ता भरला होता. हवामान आधारित पीकविमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी ४०,००० रुपये सप्टेंबर २०२४ मध्ये मिळणे आवश्यक होते. मात्र, शासन आणि विमा कंपनीने आजतागायत ही रक्कम दिलेली नाही. त्यामुळे ही रक्कम तत्काळ व्याजासह अदा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis Uday Samant : उद्योजकांनी ‘या’साठी मानले सरकारचे आभार!

या आंदोलनात माजी पं. स. सभापती विक्रम ठाकरे, बाजार समिती सभापती नरेंद्र पावडे, उपसभापती बाबाराव मांगरूळकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तुषार निकम, मानद सचिव राहुल चौधरी, किसान न्याय हक्क संघर्ष समितीचे स्वप्निल खांडेकर, चेतन ठाकरे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.