Scam of Rs 1.43 crore in government paddy procurement : पाच जणांवर फौजदारी गुन्हा; मोठ्या प्रमाणात अफरातफर
Gondia शेतकऱ्यांच्या हक्काच्या शासकीय धान खरेदी प्रक्रियेत तब्बल १ कोटी ४३ लाख ७२ हजार ३१० रुपयांचा अपहार झाल्याचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. गोरेगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री समितीअंतर्गत तीन केंद्रांवरील तिघा ग्रेडर आणि दोन केंद्रप्रमुखांनी हा आर्थिक घोळ केल्याचा आरोप आहे. लेखा परीक्षकाच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२०२३-२४ मध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आली. परंतु, करारानुसार राइस मिलर्सना धानाचा पूर्ण स्टॉक न देता मोठ्या प्रमाणात अफरातफर करण्यात आली. लेखा परीक्षक हेमंतकुमार बिसेन यांच्या तपासणीत हा घोटाळा समोर आला. रमेश वट्टी (५२, गोंदेखारी), मयूर हरिणखेडे (४५, मोहगाव), चंद्रशेखर बोपचे (४५, म्हसगाव), धर्मेंद्र वट्टी (४७, गोंदेखारी), सुदर्शन ठाकूर (५०, चिल्हाटी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Sindakhed Raja Panchayat Samiti : सहा वर्षे झाली तरी पाण्याचा प्रश्न सुटला नाही!
गोदेखारी, सर्वाटोला आणि काली माटी या तीन धान खरेदी केंद्रांवरील तिघा ग्रेडर आणि दोन केंद्रप्रमुखांनी धानाचा मोठा गैरव्यवहार केला. संस्थेच्या लेखापरीक्षणातून याचा पर्दाफाश झाला. सहायक निबंधक सहकारी संस्था, गोरेगाव यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय भुसारी करीत आहेत.
Wardha Administration : वाळूचे ट्रॅक्टर तर दिसले, मग अधिकाऱ्यांनी कारवाई का केली नाही?
गोंदिया जिल्ह्यात याआधीही शासकीय धान खरेदीमध्ये गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून सुरू असलेल्या या प्रक्रियेत पुन्हा मोठ्या घोटाळ्याची नोंद झाली आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई होईल का? की हे प्रकरणही दडपले जाईल? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.