Vidarbha Farmers : नुकसानभरपाई मिळाली नाही, विमा कंपनीत ठिय्या

Farmers staged a sit-in at the insurance company : अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

Akola प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचे मोठे नुकसान झाले असूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटना, अकोला जिल्ह्याच्यावतीने एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी २०२३ आणि २०२४ या वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीबाबत विमा कंपनीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, त्या तक्रारींवर कार्यवाही न झाल्यामुळे आणि नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर संघटनेने संबंधित तक्रारी तातडीने पात्र ठरवून नुकसानभरपाईची रक्कम वितरित करण्याची मागणी केली.

Reservation control : बंजारा समाजाचा एल्गार, लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा

या ठिय्या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, जिल्हा संघटक राहुल वानखडे, सय्यद रियाज, मंगेश गावंडे, शुभम जवंजाळ, रमेश चिंचे, रामदास भगत, प्रवीण पाटील-खोत, रामहरी आगळे, इल्यास पठाण, पीतांबर वानखेडे, मुख्तार शेख, शेख मोसिन, कुणाल राठोड, अरविंद राठोड, सोपान वहिले, पुरुषोत्तम गावंडे, हर्षल जवंजाळ, आकाश चिंचे, योगेश खोत, मुन्ना नाईकनवरे, विकी तिवारी, नंदकिशोर बबनिया, संतोष गुहे, संतोष रुद्रकार, ओम पाटील-इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी कार्यालयात अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांची नाराजी अधिकच वाढली होती. मात्र, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले. त्या बैठकीत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Puja khedkar : पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, नोटीस फाडली !

या आश्वासनानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलन मागे घेतले. तथापि, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.