39 dead, over 70 injured so far : आत्तापर्यंत 39 मृत्यू, 70 हून अधिक जखमी
Karur : तामिळनाडूतील करुर येथे अभिनेता आणि राजकारणी विजय थलपती यांच्या रॅलीदरम्यान शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला असून 70 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. काही नागरिक बेपत्ता असल्याचीही माहिती समोर आली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींना एक लाखांची मदत दिली जाणार आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. गृह मंत्रालयाने तामिळनाडू सरकारकडून तपशीलवार अहवाल मागवला आहे.
Makrand Patil : विरोधकांच्या दबावानंतर पालकमंत्री पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन घटनास्थळी भेट देणार असून त्यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील मुख्यमंत्री आणि राज्यपालांशी फोनवर चर्चा केली.
दरम्यान, विजय थलपती यांनी शोक व्यक्त करत म्हटलं की, “ही घटना असह्य वेदनादायक आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.”
Vidarbha Farmers : हंगामी पिकांचे कंबरडे मोडले, शेतजमीन खरडली
रॅलीत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने पोलिसांनी नियंत्रणासाठी लाठीचार्ज केल्याची माहितीही समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमुळे तामिळनाडूभर हळहळ व्यक्त केली जात आहे.