After the opposition’s pressure, the Guardian Minister visited the farmers : अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, मदतीची दिली ग्वाही
Buldhana जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक सातत्याने हल्लाबोल करत असतानाच अखेर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. नळकुंड, दाताळा, जांबुळ धाबा आदी गावांमध्ये जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “नैसर्गिक आपत्तीच्या संकटात राज्य शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जून ते ऑगस्टमधील अवकाळी पावसाची नुकसानभरपाई वितरित केली जात आहे. सप्टेंबरमधील नुकसानीचे पंचनामे त्वरीत पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. वाहून गेलेल्या जमीन, शेतीपूरक साधने, जनावरे व घरांची नोंद घेऊन नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.”
Dhangar community : एसटी प्रवर्गाचे आरक्षण तातडीने अंमलात आणा, अन्यथा तीव्र आंदोलन
यावेळी आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, कृषी विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Vidarbha Farmers : हंगामी पिकांचे कंबरडे मोडले, शेतजमीन खरडली
पालकमंत्र्यांच्या या दौऱ्याला विरोधकांनी उशिराने घेतलेले पाऊल म्हणत टीका केली असली तरी शेतकरी मदतीच्या घोषणांवर कितपत विश्वास ठेवतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.








