Krantikari Sanghatna aggressive for farmers’ rights : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी क्रांतिकारी संघटना आक्रमक
Buldhana सततच्या अवकाळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसह सर्व हंगामी पिकांचे कंबरडे मोडल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री व मदत पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांना निवेदन देण्यात आले. यात बुलडाणा जिल्हा तातडीने ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद आहे की, अतिवृष्टीमुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनी खरडून गेल्या असून काही ठिकाणी शेतीत तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला असून आत्महत्येची वेळ येऊ लागली आहे. अशा स्थितीत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून मदत करणे अपरिहार्य आहे.
Dhangar community : एसटी प्रवर्गाचे आरक्षण तातडीने अंमलात आणा, अन्यथा तीव्र आंदोलन
संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे –
बुलडाणा जिल्ह्यास ओला दुष्काळ घोषित करावा
शेतकऱ्यांना एकरी किमान ₹५०,०००/- थेट आर्थिक मदत वितरित करावी
Harshvardhan Sapkal : शेतकऱ्यांसाठी दिल्लीत गेले, सुरजागडवर चर्चा करून परतले
“शेतकरी हा अन्नदाता असून त्याचे जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा शेवटपर्यंत लढवू,” असा निर्धार क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे यांनी व्यक्त केला. यावेळी अमोल मोरे, दत्तात्रय जेऊघाले, राहुल शेलार, महेंद्र जाधव, शत्रुघ्न तुपकर, हर्षल गवते यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








