Vijay Wadetiwar : आधी जरांगे, आता भुजबळ… दोघांनीच मला टार्गेट केलं!

If this solves problem, Wadettiwar counterattack : यातून प्रश्न सुटला तर आनंदच वडेट्टीवारांचा पलटवार

Nagpur: छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. आम्ही त्यांच्यावर कधीच टीका केली नाही. पण त्यांनी मात्र बीडच्या सभेत मला टार्गेट केलं. आधी जरांगे पाटील आणि आता भुजबळ साहेब दोघांनी मला लक्ष्य केलं आहे. यातून समाजाचे प्रश्न सुटणार असतील, तर मला आनंदच आहे,” असा खोचक टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सरकार आणि भुजबळांवर हल्लाबोल केला. बीडमध्ये झालेल्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर थेट निशाणा साधला.

वडेट्टीवार म्हणाले, “हैदराबाद गॅझेटमध्ये ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आम्ही विरोध केला नव्हता. पण ओबीसी आरक्षण देताना ओबीसींचं आरक्षण वाढवावं, असं मी स्पष्ट म्हटलं होतं. अन्यथा मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज उपाशी राहतील. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून मला टार्गेट करण्यात आलं. नागपूरमध्ये झालेला ओबीसी मोर्चा यशस्वी झाल्याने भाजपने मला गप्प करण्यासाठी भुजबळांना पुढे केलं आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

Pawars advice : राजकारण करा पण कॉन्ट्रॅक्टर बनू नका !

ते पुढे म्हणाले, “मूळ मुद्दा हा आहे की आधी निवडक नोंदींवर कुणबी प्रमाणपत्र दिलं जात होतं. पण २ सप्टेंबरच्या शासन निर्णयानंतर आता सरसकट प्रमाणपत्र वाटप सुरू झालं आहे. ‘पात्र’ हा शब्द शासन निर्णयातून काढून टाकला गेला आणि तेव्हापासून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. जर सरकारलाच जरांगे-पाटील यांचं म्हणणं चुकीचं वाटतं, तर त्यांनीच काढलेला जीआर रद्द का करत नाहीत?” असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला.

भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे आणि अतुल सावे यांच्यावर टीका करत वडेट्टीवार म्हणाले, “हा शासन निर्णय त्यांच्या सरकारने काढला आहे. मग आता इतरांवर बोट दाखवण्याचा काय उपयोग? त्यांनीच तो निर्णय रद्द करून दाखवावा.”

Reservation controversy : ओबीसी-मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवला

ते पुढे म्हणाले, “गेल्या वर्षी जेव्हा मोर्चाचे आयोजन करण्यात आलं, तेव्हा काही सभांमध्ये कोयत्याची, तलवारीची भाषा वापरली गेली. लोकशाहीत हिंसेची नाही, संवादाची भाषा अपेक्षित आहे. पण आता महायुती सरकार मराठा-ओबीसी, धनगर-आदिवासी अशा समाजांमध्ये भांडण लावून राज्यातील मूळ प्रश्न झाकत आहे. शेतकरी उध्वस्त झालाय, रोजगार नाही, कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे आणि हे सरकार समाज भिडवण्यात व्यस्त आहे,” अशी कडवट टीका त्यांनी केली.

Fatal accident : दोन भीषण अपघातांत ९ जणांचा मृत्यू

 

शेवटी वडेट्टीवार म्हणाले, “या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार आहे. नोकरी असो वा शिक्षण हा निर्णय थेट ओबीसींच्या हक्कावर घाला आहे. हा जीआर ज्यांनी काढला तेच मंत्री आता तो रद्द करून दाखवावेत. नाहीतर समाज त्यांना माफ करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

____