व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे फोटो काढून वसुली; विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

दुष्काळात शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे फोटो काढून वसुली; विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

दिलासा देण्याऐवजी बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू असल्याचा दावा

Nagpur महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँका, पतसंस्था आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी तीव्र तगादा लावला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाणे, त्यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे काढणे आणि त्यांच्यावर दबाव टाकणे असे प्रकार सुरू असून, मंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवून हा मनमानी कारभार सुरू असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे केली.

राज्यातील शेतकरी दुष्काळ, पीक नुकसानी आणि तीव्र आर्थिक संकटामुळे हवालदिल झाले आहेत. सहकारमंत्र्यांनी कर्जाचे पुनर्गठन केले असून शेतकऱ्यांकडून कोणतीही वसुली करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात वसुली सुरूच असेल तर सरकारच्या आदेशांना काही किंमत आहे का, असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; उईकेंची‘पुन्हा घटना घडल्यास चौकशी’ची अजब अट!

तसेच, जे कोणी वसुली करायला येईल किंवा फोटो काढण्याची जबरदस्ती करेल, त्यांना कडाडून विरोध करा आणि बदडून काढा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. शेतकरी जगला काय, मेला काय, सरकारला त्याची काहीच चिंता नाही का असा सवाल करत त्यांनी, कर्नाटकात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली असताना महाराष्ट्रातील शेतकरी मात्र वाऱ्यावर असल्याचे म्हटले. सरकारने तातडीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली.

error: Content is protected !!