Vijay Wadettiwar : बाहेर जी भूमिका मांडता, तीच बैठकीत मांडा ना..!

Bhujbal and Pankaja Must Voice in Meetings What They Preach Outside : ओबीसींच्या विरोधातील शासन निर्णय कोण आणि केव्हा रद्द करणार ?

Mumbai : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना पाडा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ करत असतील तर मग सरकारच पाडले पाहिजे. ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा शासन निर्णय सरकारने काढला आहे. त्या मंचावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गेले होते. छगन भुजबळ एकीकडे मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणार आणि दुसरीकडे टीका करणार असतील, तर हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मुंबईत आज (२० सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर जी भूमिका मांडत आहेत, तीच भूमिका त्यांनी उपसमितीच्या बैठकीत मांडावी. ओबीसींच्या विरोधातील शासन निर्णय कोण रद्द करणार आणि केव्हा रद्द करणार, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

NCP Sharad Pawar : जयंत पाटलांवरील टिकेचे पडसाद, नागपुरात राष्ट्रवादी आक्रमक !

 

२ सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसेल तर सरकारने सर्व ओबीसी नेत्यांना बोलवावे, चर्चा करावी. मग आम्ही ओबीसींचे काय नुकसान होत आहे, त्याचे पुरावे देऊ. महायुती सरकारने काढलेल्या निर्णयामुळे मराठवाडा पेटला आहे. पुन्हा ओबीसी विरूद्ध मराठा वाद वाढला आहे. दोन समाजांत इतका द्वेष पसरला आहे की शाळांमधून विद्यार्थ्यांना काढले जात आहे. हे सरकार जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

Bapu Birus son : एवढा मोठा झाला का तू? अंगावर कपडे सुद्धा ठेवणार नाही…”

आई-वडीलांवर बोलू नये..
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. पडळकर यांची टीका म्हणजे आईला शिवी दिली आहे. राजकीय पुढाऱ्यांवर टीका भलेही करा, पण त्यांच्या आई-वडीलांवर असे गलीच्छ बोलणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडत आहे. पडळकर कुणाच्या इशाऱ्यावर येवढं बोलत आहे, कोण त्याला पाठीशी घालत आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.