Breaking

Vijay Wadettiwar : मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी !

 

Vijay Wadettiwar said that the Mangeshkar family is a gang of robbers : गरिबांचे शोषण करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे

Nagpur : मंगेशकर कुटुंबाने कधी काही दान केल्याचं कुणी पाहिलं का? केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून त्यांचा उदो उदो केला. लोकांसाठी त्यांचे समर्पण असते तर सेवा केली असती. ज्या खिलारे पाटलांनी दवाखान्यासाठी जमीन दिली, त्यांनाही या लोकांनी सोडलं नाही. माणुसकीच्या नावावर कलंक असणारे हे कुटुंब आहे. मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टवार यांनी केली.

नागपुरात आज (१० एप्रिल) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, गरिबांचे शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नये. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तुळजापूर ड्रग प्रकरणी प्रश्न विचारला असता, देवांनासुद्धा या लोकांनी सोडले नाही. त्यांनी मंदिराचे पावित्र्य घालवले आहे. एका विशिष्ट पक्षाच्या आमदाराच्या जवळचे लोकांची नावं पुढं आली असल्याची माहिती आहे. ज्या पुजाऱ्यांनी पाप केले त्यांना फटके मारणार का, असा सवाल करत त्या पुजाऱ्यांना सोडू नये. लोकांच्या भावनेशी जे खेळतात, त्यांना फटके देणे पुण्याचं काम होईल, असेही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ !

आतंकवादी तहवूर राणा याला आणल्याचा आनंद आहे. जर आतंकवादी राणाला आणता येते, तर मग दाऊदला का आणले नाही? वर्ष गायकवाड बोलल्या त्याप्रमाणे हिम्मत का दाखवत नाही. या बॉम्बस्फोटामागे कोण होतं, हे सर्वांना माहीती आहे. जवाबदारी स्वीकारणाऱ्या दाऊदला आणावे. महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राणाला आणून राजकारण करू नये. त्याला फाशी दिली पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये त्याचा उपयोग करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न ते करतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : बीडमध्ये चोरट्यांचा कहर, चक्क गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल फोन चोरला !

चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यात बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी एका शेतकऱ्याला बैलजोडी जप्त करण्याची धमकी देऊन २०० रुपयांची लाच घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोललो. त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे जनावर कत्तलखान्यात जातात, ते अडूवुन गोसेवक असल्याचे दाखवतात. यातील अनेक जण लुटारू आहेत. चंदा वसूल करणे हा त्यांचा धंदा आहे. काही इमानदार असतील तर त्यांचे स्वागत करू . पण भगवा दुपट्टा घालून या भाषेत शेतकऱ्याला धमकावत होता त्यावरून हे लुटारूंची टोळी आहे, हे आता स्पष्ट झाले असल्याचे वड्ट्टीवार म्हणाले.