Audio clip of Laxman Haake goes viral : लक्ष्मण हाकेंची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल
Pandharpur : ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण, त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत असून त्यावरून मोठी खळबळ उडाली आहे. समाजासाठी काम करण्याचा दावा करणाऱ्या हाके यांना एका तरुणाने फोनवर चांगलंच सुनावलं आणि “जनाची नाही तर मनाची लाज तरी ठेवा” असे खरमरीत फटकारले.
क्लिपमध्ये सुरुवातीला तो तरुण हाकेंचं कौतुक करताना दिसतो. “तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतं. आम्ही विचार केला, तुम्हाला काही मानधन द्यावं. समाजासाठी एवढं धावताय, गाडीसाठी तेल लागतं. कॅश द्यायचं का गुगल पे, फोन पे?” असा प्रश्न त्याने हाकेंना केला.
Loan waiver : 248 शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्यावी लागणार
त्यावर हाके म्हणाले, “नाही दादा, भेटल्यावर द्या…” पण तरुणानं लगेच यूपीआय ट्रान्सफरची ऑफर दिली. थोडं टाळाटाळ केल्यानंतर अखेर हाके यांनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर देत सांगितलं, “माझं अकाउंट नाही. अकाउंटला मी पैसे घेत नाही.”
Food Security Policy : हे कसले अन्नसुरक्षा धोरण? १५ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार
यावर तरुण सरळ सरळ भडकला. त्याने हाके यांना चांगलंच सुनावलं “तुम्ही समाजासाठी एवढं काम करता म्हणता, पण प्रत्यक्षात लोकांकडून पैसे घेता. सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलता. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? जनाची नाही तर मनाची लाज तरी ठेवा. समाजाच्या विरोधात भडकवता. जरांगेंला बोलता. शहाजी बापूंच्या विरोधात उभा राहिला, तरी 200 मते पण पडली नाहीत. तुझी औकात नाही. तू समाजाच्या विरोधात काम करतोस.”
Vidarbha Farmers : बुलढाण्यात सात महिन्यांत १०२ शेतकरी आत्महत्या
या व्हायरल क्लिपनंतर हाके अडचणीत आले आहेत. सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे मागितल्याचा आरोप सरळ सरळ त्यांच्या गळ्यात पडत आहे. हाके यांचा बचाव करण्याऐवजी अनेकांनीच सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
लोकांसमोर ‘समाजासाठी लढणारा नेता’ अशी प्रतिमा मिरवणारे हाके आता स्वतःच्याच शब्दांमुळे अडचणीत आले आहेत. तरुणाने सुनावलेले शब्द केवळ हाकेच नव्हे तर त्यांच्या राजकीय प्रतिमेलाही मोठा धक्का देणारे ठरत आहेत.
____








