Villagers have not paid Rs 43 crore in taxes : मालमत्ता व पाणी कराचा भरणाच नाही, वसुलीसाठी कसरत
Wardha नागरिकांकडून कराचा भरणा करण्याकडे कानाडोळा होत असल्याने त्याचा ग्रामविकासावर परिणाम होतो. आता मार्च एण्डिंग जवळ आले आहे. अद्याप निम्म्यापेक्षा अधिक नागरिकांनी मालमत्ता व पाणी कराचा भरणा केला नसल्याने वसुलीकरिता ग्रामपंचायतींना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण ५२१ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींना मार्च एण्डिंगपूर्वी मालमत्ता व पाणीकर वसूल करणे आवश्यक आहे. परंतु, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार ४४.९२ टक्के मालमत्ता कर वसुली झाली आहे. गावकऱ्यांकडे १५ कोटी ९८ लाख ९४७ हजार रुपये मागील कर थकबाकी आहे.
तर चालू वर्षाचा २७ कोटी ४३ लाख ६१ हजार ४३८ रुपये कर आहे. कराची एकूण रक्कम ४३ कोटी ४१ लाख ६२ हजार ३८५ रुपये इतकी आहे. यापैकी मागील थकबाकीतील केवळ ७ कोटी ९६ लाख ७२ हजार ९३३ रुपये आणि चालू मागणीतील ११ कोटी ३२ लाख ७७ हजार ३६७ रुपयेच वसूल झाले आहेत. एकूण वसुली केवळ १९ कोटी ५० लाख १३ हजार ९८७ रुपये इतकी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचे करवसुलीकरिता प्रयत्न कमी पडत आहेत.
Wardha District Hospital : तानाजी सावंत यांच्या काळात नागपूरच्या रुग्णालयाशी ‘आर्थिक’ करार?
जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ८ कोटी ७२ लाख ४३ हजार ६६२ रुपयांची मागील वर्षीची पाणीपट्टी थकली आहे. चालू वर्षाची १४ कोटी ६३ लाख ९३ हजार ८३ रुपये पाणीपट्टी आहे. त्यामुळे यावर्षीची एकूण मागणी २३ कोटी ३६ लाख ३६ हजार ७४५ रुपये इतकी आहे. यापैकी मागील थकबाकीतील ३ कोटी ९६ लाख ८७ हजार २३७ आणि चालू वर्षातील ६ कोटी २७ लाख १६ हजार २६१ रुपये अशी एकूण १० कोटी ३१ लाख २३ हजार २७३ रुपयांची वसुली झाली आहे.
जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींपैकी जवळपास ३३० ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याने याचा परिणाम कर वसुलीवर झाल्याचे दिसून येत आहे. पदाधिकारी असताना कर वसुलीचा सपाटा लावला जातो. त्यासोबतच ते नागरिकांची समजूत काढून वसुलीवर भर देतात. परंतु, प्रशासक दिवस काढण्यात धन्यता मानत असून, त्यांचा निधी जिरवण्यावर भर असल्याने बाकी बाबींकडे दुर्लक्ष होत आहे.
पाणीपट्टीची वसुली झाली आहे. मालमत्ता कराचीही परिस्थिती तीच आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केवळ ४४.९२ टक्के मालमत्ता कर वसूल केला आहे. आता अवघ्या दहा दिवसात उर्वरित कर वसुलीकरिता प्रयत्न करावे लागणार आहेत.