Health worker recruitment delayed : नियुक्तीचे आदेश देऊनही ६९ पदे रिक्त
Wardha जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य सेवक पदभरतीसंदर्भात न्यायालयीन निकाल लागून महिना लोटला. ग्रामविकास विभागाने तत्काळ नियुक्तीचे आदेशही दिले. मात्र, जिल्हा परिषदेने अद्यापही ६९ आरोग्य सेवकांची नियुक्ती केली नाही. इतर जिल्ह्यांत नियुक्त्या मिळाल्या. मात्र, वर्धा जिल्ह्यात का नाही, असा सवालही उमेदवारांकडून विचारला जात आहे.
आरोग्य सेवकांच्या पदभरतीचा न्यायालयीन निकाल ६ मार्च रोजी जाहीर झाला. त्यानुसार १२ मार्च रोजी ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील ६९ आरोग्य सेवकांना नियुक्ती देण्याच्या सूचना दिल्या. मात्र, जिल्हा परिषदेकडून अद्यापही नियुक्ती मिळाली नाही. कागदपत्र पडताळणी, अंतिम निवड यादी सप्टेंबर २०२४ मध्येच प्रसिद्ध झाली. आता केवळ नियुक्ती बाकी असताना अधिकाऱ्यांकडून चालढकल केली जात असल्याचेही सांगण्यात येते.
Home Ministry : वित्तीय संस्थांमधील गैरव्यवहार; गृह विभाग Action Mode वर!
नागपूर, अमरावती, सोलापूर, गडचिरोली व अकोला या जिल्हा परिषदांनी १२ मार्चनंतर नियुक्त्या दिल्या. मात्र, वर्ध्यात अद्यापही नियुक्त्या मिळाल्या नसल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोग्य सेवक भरतीची जाहिरात २०२३ मध्ये निघाली होती. त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात आली. नंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि न्यायालयीन प्रकरणामुळे बराच वेळ गेला.
आता न्यायालयाने निकाल दिला आणि ग्रामविकास विभागाने नियुक्तीचे निर्देश दिले. तरीही वर्धा जिल्हा परिषदेने आरोग्य सेवकांची नियुक्ती केली नसल्याने उमेदवारांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील ६९ आरोग्य सेवकांच्या नियुक्तीसंदर्भात सप्टेंबर २०२४ मध्येच कागदपत्र पडताळणी, अंतिम निवड यादी जाहीर झाली होती. त्यानुसार नियुक्ती बाकी असतानाही आता पुन्हा कागदपत्र पडताळणीचे कारण देऊन नियुक्ती देण्यास चालढकल होत असल्याने उमेदवारांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
Hanuman Jayanti : जामखारीचे सिद्ध हनुमान मंदिर : शंभर वर्षांची आस्था!
दरध्यान, जिल्ह्यात ६९ आरोग्य सेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी करण्यात आली. लवकरच यादी जाहीर करून आरोग्य सेवकांना नियुक्ती पत्र दिले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.