Winter Session : आपला दवाखाना भ्रष्टाचाराचं कुरण? दवाखान्याच्या जागी साडीचं दुकान!

BJP MLA makes serious allegations against Shinde governments plan : शिंदे सरकारच्या योजनेवर भाजप आमदाराचा गंभीर आरोप

Nagpur : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनेवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असून धक्कादायक बाब म्हणजे हा आरोप विरोधकांनी नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या आमदारानेच विधानपरिषदेत केला आहे. “आपला दवाखाना ही योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाली आहे का?” असा गंभीर सवाल भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला. यामुळे आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विधानपरिषदेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आरोग्यविषयक प्रश्नांची उत्तरे देत असताना डावखरे यांनी थेट शिंदे सरकारच्या योजनेवर भ्रष्टाचाराचे बोट ठेवले. ते म्हणाले, “शासनाचा हेतू उत्तम आहे, पण स्थानिक पातळीवरील अधिकारी आणि स्वराज्य संस्थांतील कर्मचारी भ्रष्टाचारात गुंतले आहेत का? असा संशय निर्माण झाला आहे.”

Cash bomb politics : दानवे पाठोपाठ मनसेच्या देशपांडेचाही ‘कॅश बॉम्ब’

डावखरे यांचा सर्वात धक्कादायक खुलासा ठाणे येथील एका दवाखान्याबाबत होता. त्यांनी सभागृहातच प्रश्न विचारला “ठाण्यातील आपला दवाखाना बंद होता आणि त्याच जागी साडीचं दुकान सुरु होतं का?” ठाणे महानगरपालिकेने पत्रकार परिषद घेऊन दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच या प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई झाली का, आणि झाली असेल तर त्याची माहिती सभागृहाला देण्याची मागणी केली.

Buldhana zilla parishad : बुलढाण्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी सामूहिक रजेवर

आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत बोलताना डावखरे म्हणाले की, या दवाखान्यांत डॉक्टर्स व नर्सेस उपलब्ध नसतात, केवळ काही टेक्निशियन उपस्थित असतात, ज्यामुळे गरीब लाभार्थ्यांना मिळणारी वास्तविक सेवा प्रश्नचिन्हात येते. “दवाखान्यात टेस्टिंग केल्यानंतर रुग्णांना हॉस्पिटलमध्येच पाठवले जाते, मग या योजनेचा उद्देश कशासाठी?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Dalvi Cash Video : दानवेंना खासदार सुनील तटकरेंनीच व्हिडीओ पाठवला !

या आरोपांवर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “ठाणे मनपातील गैरव्यवहारांबाबत आम्ही तपास करू. त्रुटी मिळाल्यास तातडीने कारवाई केली जाईल आणि कोणालाही सूट दिली जाणार नाही.” तसेच योजनेतील स्टाफ आणि सुविधा या संदर्भात आवश्यक बदल आणि सूचना स्वीकारण्यास सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप आमदाराकडूनच शिंदे सरकारच्या योजनेवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आल्याने हिवाळी अधिवेशनात आरोग्य क्षेत्रातील गोंधळ, अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा जोरदार गाजण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.