Delay in implementation despite High Court order, government admits in Assembly : हायकोर्ट आदेश असूनही अंमलबजावणीत विलंब, सरकारची विधानसभेत कबुली
Nagpur : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत धक्कादायक माहिती विधानसभेत समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र ठरलेल्या तब्बल ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना गेल्या आठ वर्षांपासून लाभ मिळालाच नाही, अशी स्पष्ट कबुली सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लेखी उत्तरामध्ये दिली. उच्च न्यायालयाने पात्र लाभार्थ्यांना तत्काळ मदत देण्याचे आदेश दिल्यानंतरही अंमलबजावणीत झालेला हा विलंब गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे.
या प्रलंबित कर्जमाफीसाठी ५,९७५.५१ कोटी रुपयांची आवश्यकता असून पुरवणी मागणीत अवघे ५०० कोटी रुपयेच मंजूर करण्यात आल्याने राज्य सरकारची इच्छाशक्ती कितपत गंभीर आहे, याविषयी शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी आकडेवारी सादर केली. न्यायालयीन आदेशानंतरही लाभ न देणे, तसेच निधीअभावी लाखो शेतकऱ्यांची फाईल थंडगार राहणे हा शेतकऱ्यांवरील अन्यायच असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
Local Body Elections : चारही प्रभागात ७ उमेदवार रिंगणात, ७ए मध्ये थेट लढत
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल १ अब्ज रुपयांची रक्कम जमा झाली; मात्र अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ७५ हजार रुपयांची मदत मिळाल्याचे आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांच्या मागणीवरून उघड झाले. साखर कारखान्यांना उसामागे १० रुपये मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे राज्य सरकारने दिलेले आदेश मोठ्या वादाचे ठरले होते. तरीही या निधीतील रक्कम शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचणे ही चिंताजनक बाब मानली जात आहे.
Maharashtra Navnirman Sena : बेकायदेशीररित्या जमीन वर्ग केली, तलाठी संजय चव्हाण निलंबीत
अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेल्या ३१,६२८ कोटींच्या मदत पॅकेजची अंमलबजावणीही तांत्रिक अडथळ्यांमुळे खोळंबली असून ई-केवायसी, बँक आणि आधारमाहितीतील विसंगती तसेच पोर्टलवरील त्रुटींमुळे ५ लाख ४२ हजार १४१ शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे ३५५ कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम तिजोरीतच अडकून आहे. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाकडे सरकारकडून होत असलेली दुर्लक्ष्यता ही गंभीर बाब असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
____








