Winter session of the legislature : हिवाळी अधिवेशनात सुट्टीच्या दिवशीही होणार कामकाज !

Nagpur winter session to continue on holidays : विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Nagpur : महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यात आले. यानुसार हिवाळी अधिवेशनाचे आयोजन यंदा ८ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूर येथे करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, १३ डिसेंबर (शनिवार) आणि १४ डिसेंबर (रविवार) या शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे नियमित कामकाज घेण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीस विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, तसेच उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते.

Maharashtra Political : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत आमनेसामने; आशिष शेलारचीही उपस्थिती

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, तसेच दोन्ही सभागृहांतील सदस्य सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अमीन पटेल, विधानपरिषद सदस्य अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

पद्मश्री व राज्यसभेची ‘ऑफर’ देऊन मोठा घोटाळा

या अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय आणि धोरणात्मक विषयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. नागपूरमध्ये अधिवेशनाचा माहोल आधीच तापू लागला आहे. मंत्रालयातील अनेक विभागांचे कामकाज नागपूरकडे हलवल्याने जिल्ह्यातील प्रशासकीय हालचाली वाढल्या आहेत.
बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत झालेल्या विशेष चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि. स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.

Nagar Parishad Election 2025: मतदारराजाचा कौल मतपेटीत बंद!

संविधानाच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचे स्मरण, राज्यातील प्रशासकीय प्रश्न, विकासाचा आराखडा आणि विविध कायदे विषयक प्रलंबित मुद्दे, या सर्वच मुद्यांवर यंदाच्या हिवाळी अधिवेशनात तापलेल्या चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या पारंपरिक अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज होणार असल्याने अधिवेशन अधिक गतीमान आणि निर्णायक होणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.