Women Commission : महायुती सरकार देवासारखं, महिला आयोग परिषदेत वक्तव्य

Rupali Chakankars controversial comparison : रुपाली चाकणकरांची वादग्रस्त तुलना

 

Mumbai : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील महिला आयोग परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं. या परिषदेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या कामाचं कौतुक करताना महायुती सरकारवर स्तुतीसुमनं उधळली. विशेष म्हणजे महायुतीतील तिन्ही प्रमुख नेत्यांना त्यांनी थेट देवाची उपमा दिली.

महाराष्ट्रात त्रिदेवाचे सरकार आहे, ब्रह्मा-विष्णू-महेशाचं हे सरकार आहे, असं वक्तव्य करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी तुलना केली. त्यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्या या विधानावर टीका होण्याची शक्यता आहे.

NCP Politics : अजित पवारांच्या ‘त्या’ भेटीने राजकीय चर्चांना उधाण !

या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया राहाटकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की महिला आयोगाने मागील काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. महिलांच्या समस्यांवर जनसुनावणी घेऊन मदत केली जाते, तसेच मानसिक आरोग्य, बालविवाह, ह्युमन ट्रॅफिकिंग यांसारख्या गंभीर प्रश्नांवर शून्य सहिष्णुतेने काम सुरू आहे. खासगी कंपन्यांमध्ये ऑडिट व्हायला हवं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Vice Presidential Election : तुम्हाला क्रॉस वोटिंग ची भीती आहे का ?

चाकणकर म्हणाल्या की, मेटा सोबत महिला सुरक्षेसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. कामगारांसाठी प्रशिक्षण शिबिरे, मिशन उत्कर्ष यांसारखी उपक्रमं यशस्वीपणे राबवली जात आहेत. महिला आयोग हा महिलांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी ठाम आवाज ठरत आहे. यावेळी महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनीही महिला आयोगाच्या कामाचं कौतुक करत आयोगाच्या उपक्रमांना पाठिंबा दिला.  रुपाली चाकणकरांनी महायुती सरकारला दिलेल्या देवाच्या उपमेवरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

_____