Fadnavis discussion with Thackeray – Pawar, Rauts counterattack : फडणवीसांची ठाकरे – पवारांशी चर्चा, राऊतांचा पलटवार
Mumbai ; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या विजयासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी थेट फोनवरून चर्चा केली आहे. मात्र या हालचालींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे रेड्डी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. मी आणि शरद पवार यांनी त्यांचा अर्ज दाखल करताना हजेरी लावली होती. त्यामुळे फडणवीसांनी आमच्याकडे मतं मागणं हा फक्त शिष्टाचार आहे, त्यापलीकडे काहीही नाही.
Revenue Department : पांदण रस्त्यांचा अभ्यासगट बदलवणार शेतकऱ्यांचे जीवनमान !
राऊत म्हणाले की, संविधान पायदळी तुडवून आमदार आणि खासदार फोडणारे, पक्ष फोडणारे लोक आज मतांसाठी फोन करतात हे आश्चर्यकारक आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला आणि आता त्यांच्याकडूनच मतं मागितली जात आहेत. तुम्ही म्हणता की तुमच्याकडे बहुमत आहे तर मग मतं मागण्याची गरजच काय? की तुम्हाला भीती आहे की तुमचे खासदार क्रॉस व्होटिंग करतील?
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील खासदारांनी आपल्या राज्यातील उमेदवाराला मतदान करायला हवं असं आवाहन केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की आम्हाला फडणवीसांनी चाणक्यगिरी शिकवण्याची गरज नाही. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे आहेत, महाराष्ट्राचे नाहीत. राज्यपाल हा राज्याचा नागरिक नसतो तर घटनात्मक पद असतो. त्यामुळे आम्ही घटनेचा आदर करतो, पण फडणवीसांना आम्हाला धडे द्यायचा अधिकार नाही. तुम्ही मराठी माणूस उमेदवार दिला असता तर कदाचित चर्चा झाली असती, पण आता नाही.
Chhagan Bhujbal : माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य? भुजबळही व्यक्त झाले !
राऊत यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता व्यक्त केली. मोदींकडे कागदोपत्री बहुमत दिसत असलं तरी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये अस्वस्थता आहे. राहुल गांधींनी देशात निर्माण केलेल्या वातावरणामुळे काही खासदार वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळेच फडणवीस आणि राजनाथ सिंह नेत्यांशी संपर्क साधत आहेत. निवडणुकीत अशा प्रकारच्या चर्चा होत असतात, पण त्याने आमच्या भूमिकेत बदल होणार नाही.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुरू झालेली मोर्चेबांधणी आणि विरोधकांची ठाम भूमिका यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.








